उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा ...
schedule21 Jul 25 person by visibility 309 categoryदेश

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी यामागे आरोग्यविषयक कारणे दिली आहेत.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात, आरोग्य समस्या आणि वैद्यकीय सल्ल्याचा हवाला देत संविधानाच्या कलम 67(अ) अंतर्गत राजीनामा दिला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात जगदीप धनखड यांनी लिहिले आहे की, आरोग्याला प्राधान्य देऊन आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ राजीनामा देत आहे.
याशिवाय, त्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे सहकार्य आणि सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल आभार मानले. याशिवाय, त्यांनी पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळाकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता.