SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डीकेटीईच्या टेक्स्टाईलमधील सात विद्यार्थ्यांची जॉर्डन येथील क्लासीक फॅशन ऍपेरिएल कंपनीत प्लेसमेंटपंचगंगा प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची कामे कोणत्याही परिस्थितीत मुदतीत पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगेविधानसभा निवडणूक : कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघातील ईव्हीएम मेमरी, मायक्रोकंट्रोलरची तपासणी, पडताळणी ...नामदेवरायांचे प्रतिभाशाली अभंगधनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने महा रक्तदान शिबिर उत्साहात विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कृषी क्षेत्रात सुधारणा आवश्यक : ऊरी रुबेनस्टेनअवैध सावकारांविरोधात कठोर कारवाई होणार : जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी प्राधान्यक्रम ठरवून सीएसआर मधून निधी आणूया : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, राजेश क्षीरसागरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंट मुंबईचे नुतन अध्यक्ष देवदत्त कल्याणकर शक्तीपीठाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यासाठीं, आमदार शिवाजी पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या डोक्यावर बंदूक ; आमदार सतेज पाटील यांचा आरोप

जाहिरात

 

अवैध सावकारांविरोधात कठोर कारवाई होणार : जिल्हाधिकारी अमोल येडगे

schedule22 Jul 25 person by visibility 116 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यात अवैध सावकारीच्या अनुषंगाने सावकारी कायद्याची कडक अंमलबजावणी करुन अवैध सावकारांवर त्वरीत कारवाई करुन सावकारांच्या पाशात अडकलेल्या अगर सावकारांकडून पिळवणूक होत असलेल्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देवून अवैध सावकारीच्या पाशात अडकलेल्या नागरिकांनी समितीकडे मदतीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

सावकारांकडून होणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांच्या पिळवणुकीस प्रभावी रितीने प्रतिबंध करण्यासाठी समुचित व कठोर सामाजिक आणि कायदेशीर उपाययोजना करणे तसेच महाराष्ट्र सावकारीच्या व्यवहारांचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी चांगल्या तरतुदी असलेला महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ महाराष्ट्र शासनाने दिनांक ४ एप्रिल २०१४ रोजी प्रसिध्द केला आहे. अनधिकृत सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या उद्येशाने तसेच सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ ची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत जिल्हा स्तरावर त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असून जिल्हा पोलीस प्रमुख हे सदस्य तर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था हे सदस्य सचिव आहेत. या समितीमार्फत आढावा सभा घेऊन जिल्ह्यातील अनधिकृत सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या उद्देशाने तसेच सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी करावयाच्या कामकाजाच्या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष मार्गदर्शन देत असतात.

जिल्ह्यात अवैध सावकारीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जावर कार्यवाही करण्यात येत आहे. काही प्रकरणांत प्रत्यक्ष सावकाराच्या राहत्या घरी, दुकान अगर व्यवसायाच्या ठिकाणी विहीत पध्दतीने पथक गठीत करुन धाडी टाकण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ या कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने ६८ खासगी सावकारांवर धाडी टाकण्यात आल्या असून २० खासगी सावकारांवर अवैध सावकारीच्या अनुषंगाने कागदपत्र, दस्तऐवज आढळल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर कार्यालयात प्राप्त झालेल्या अवैध सावकारीच्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने चौकशी कामकाज पूर्ण करुन ४ अर्जदार शेतकऱ्यांच्या (स्थावर) शेत जमीनी परत करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. तसेच अवैध सावकारांवर गुन्हा दाखल करुन जंगम मालमत्ता (एक चारचाकी वाहन व दोन दुचाकी वाहन) परत करण्याचे आदेश केले आहेत.

जिल्ह्यातील अवैध सावकारीच्या अनुषंगाने आर्थिक पिळवणूक अगर अवैध सावकारीच्या ओघात स्थावर मालमत्ता, शेती, जमीन तसेच जंगम मालमत्ता सावकाराने बळकावली असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर कार्यालयात तात्काळ संपर्क साधावा अगर ddrkolhapur@gmail.com  या ईमेलवर अगर प्रत्यक्षात येऊन तक्रार अर्ज सादर करावेत. अशा तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन सहकारी संस्थेच्या जिल्हा निबंधकांनी केले आहे.  

अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर, सहकार भवन, १ ला मजला, हॉटेल पर्लजवळ, न्यु शाहूपुरी, कोल्हापूर येथे ०२३१- २६५६२५८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes