आचारसंहितेमुळे कोल्हापूर महापालिकेचा लोकशाही दिन व जनता दरबार स्थगित
schedule01 Oct 26 person by visibility 102 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी (शासकीय सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी) लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. तसेच शहरातील नागरिकांच्या समस्या व अडचणी थेट जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात येतो.
मात्र, महाराष्ट्र विधान परिषदेच्या 03 पदवीधर व 02 शिक्षक मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक -2026 अनुषंगाने शहरात मंगळवार, दि.22 सप्टेंबर 2026 पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेच्या कालावधीत महापालिकेचा लोकशाही दिन व जनता दरबार आयोजित करण्यात येणार नाही. याची संबंधित नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.