SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघ जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादकांचा राहावा : आमदार सतेज पाटीलतारदाळ येथे वाहनांच्या फिटनेस तपासणीची सुविधा सुरू : आमदार यड्रावकर डीएसओ बुद्धिबळ निवड स्पर्धेत केन चेस अकॅडमीचा ऐतिहासिक यश; १५ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवडडी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअपश्री शाहू सह. दूध व्यव. संस्था मर्या. नागांवची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; उत्कृष्ट दूध उत्पादकांचा गौरव!कोल्हापुरात ४ ऑक्टोबरला 'खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा'; रोख बक्षीसांसह ४१ आकर्षक पारितोषिके जिंकण्याची सुवर्णसंधी!दुष्काळाच्या छायेत संवेदनशील निर्णय! भागीरथी संस्थेची 'झिम्मा फुगडी' स्पर्धा रद्द; बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार“स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्ने पाहा!” प्राध्यापक नितीन बानगुडे यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेशशामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गावोगावी मोफत आरोग्य शिबिरेजीवनगौरव पुरस्काराबद्दल कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांचा यड्रावकर कुटुंबाकडून सत्कार

जाहिरात

 

गोकुळ दूध संघ जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादकांचा राहावा : आमदार सतेज पाटील

schedule30 Sep 26 person by visibility 92 categoryउद्योग

कोल्हापूर : एवढंच नाही, तर भविष्यात गोकुळ दूध संघाचा कारभार परप्रांतीय अमूलवर अवलंबून राहता कामा नये, हा संघ कोल्हापूरच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्याच हक्काचा राहिला पाहिजे यासाठी आमचा लढा सुरू असल्याचे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले ते हातकणंगले तालुक्याच्या दौऱ्या दरम्यान मेळाव्यात बोलत होते 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील दूध संस्था ठरावधारकाच्या समविचारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी भेट घेतली. दरम्यान  आज पेठवडगाव,रुई, हातकणंगले, इंगळी, रेंदाळ येथे ठराव धारकांचा मेळावा पार पडला. प्रामुख्याने जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, किरण इंगवले, हुपरी नगरसेवक सुरज बेडगे, रवी नाईक शिरीष देसाई शिवराज नाईक भगवान जाधव धोंडीराम पाटील या प्रमुख लोकांची भेट घेतली. 

या मेळाव्यात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीचे अनेक नेते आज हतबल झाले आहेत, कारण त्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकारच उरलेला नाही. गेल्या पाच वर्षांत आम्ही अनेक चांगले शेतकरी   हिताचे निर्णय घेत होतो मात्र आता महायुतीमध्ये निर्णयांसाठी त्यांना मुख्यमंत्र्यांकडेच जावे लागते. हे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अजिबात मान्य नाही. महायुतीची ही परिस्थिती पाहता भविष्यात दूध उत्पादकांचे काय होणार, याची मोठी चिंता वाटत असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
गोकुळ दूध संघाचा कारभार परप्रांतीय अमूल दूध संघावर अवलंबून राहता कामा नये. हा संघ कोल्हापूरच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्याच हक्काचा आणि मालकीचा राहिला पाहिजे. हातकणंगले परिसरातील १६१ पैकी ८१ हून अधिक ठरावधारक आज राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीसोबत भक्कमपणे उभे आहेत.

आघाडी सत्तेवर आल्यास गोकुळ दूध उत्पादकांसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला अधिक चांगला दर देणार. म्हैस खरेदीसाठी अनुदान तसेच मुक्त गोठ्याच्या कंपाउंडसाठी ५०% अनुदान देणार. पशुखाद्याच्या दरात प्रति पोते १०० रुपयांची कपात करणार. कळंबा-गारगोटी मार्गावरील कात्यायनी येथील २० एकर जागेत अत्याधुनिक म्हैस खरेदी केंद्र उभारणार. गोकुळच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक रुपयामागे ९० पैसे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार प्राथमिक दूध संस्थांच्या इमारती बांधकामासाठी अनुदान, संस्था सचिवांना मानधन आणि जनावरांच्या गोठ्यासाठी २५ हजार रुपयांचे सहाय्य देणार जनावरांच्या गाभण प्रक्रियेसाठी ब्रीडिंग नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार.
हे सर्व कल्याणकारी उपक्रम राबवण्यासाठी समविचारी आघाडीच्या सर्व उमेदवारांना एकमुखी कौल देऊन विजयी करण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

या मेळाव्यास गुलाबराव पोळ, उपनगराध्यक्ष अभिजीत गायकवाड, भगवानराव जाधव, शशिकांत खवरे, राहुल सावंत, महेश कुंभार, उत्तम सावंत, अभिषेक इंगवले, कपिल पाटील, भारत पाटील, राजवर्धन पाटील, ॲड शहाजी पाटील, अभिजीत पाटील, अभिजीत माने, बाळासाहेब माने, अजित पोवार- धामोडकर, प्रवीण सोनवणे, आदेश राजूबाबा आवळे, बाबासो चौगले, रामराजे कुपेकर, बयाजी शेळके, सचिन घोरपडे, बाबासो देवकर, विकास पाटील, विद्याधर गुरबे, विशाल पाटील, मोहन धुंदरे विविध दूध संस्थांचे अध्यक्ष, संचालक व मोठ्या संख्येने ठरावधारक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes