SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षान्त सोहळ्यात ६०,२५० पदवीधर; विद्यार्थिनींची ५७.५५ टक्के बाजी, ‘विकसित भारत २०४७’ चा निर्धारस्त्री शिक्षणाचे आद्य प्रणेते व सत्यशोधक महात्मा जोतिराव फुलेनवे दानवाडच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १९३ नागरिकांची तपासणीकोल्हापूर : अतिक्रमण आणि नागरी प्रश्नांवरून स्थायी समिती सभेचे कामकाज रोखले; जोपर्यंत कारवाईचे उत्तर नाही, तोपर्यंत कामकाज नको; सदस्यांचा आक्रमक पवित्राचंबुखडी मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व दुरुस्तीमुळे सोमवारी बालिंगा जलउपसा केंद्रावर अवलंबून भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार​​"संविधानाचा खरा सन्मान राखण्याचे काम भाजपकडूनच; काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे" : खा. धनंजय महाडिककागलमध्ये उद्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयांचा प्रवेश समारंभधारावी येथील सुविधा केंद्राला महापौरांची भेट; CSR फंडिंगच्या माध्यमातून कोल्हापुरात महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व सुरू करण्याचा संकल्प!हिंदकेसरी नेर्ली माळ येथे रविवारी भव्य ‘राजेश केसरी’ बैलगाडी शर्यतीचा थरार; लाखो रुपयांची रोख पारितोषिकेकृष्णा–भीमा नदीजोड प्रकल्पासाठी केंद्राने सहकार्य करावे, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे मागणी

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षान्त सोहळ्यात ६०,२५० पदवीधर; विद्यार्थिनींची ५७.५५ टक्के बाजी, ‘विकसित भारत २०४७’ चा निर्धार

schedule28 Nov 26 person by visibility 134 categoryसामाजिक

कोल्हापूर : करवीरनगरीतील शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा वार्षिक दीक्षान्त समारंभ अत्यंत दिमाखदार आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला या सोहळ्यात तब्बल ६०,२५० स्नातकांना विविध पदव्या, पदविका आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली असून, त्यामध्ये ३४,६७० विद्यार्थिनींचा (५७.५५ टक्के) समावेश असणे ही स्त्री शिक्षणाच्या परंपरेसाठी मोठी जमेची बाजू ठरली आहे.
​समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय लष्कराचे माजी प्रमुख आणि अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल जनरल जे. जे. सिंग तसेच राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी कुलगुरू प्रा. डॉ. राजनेश कामत यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला . तीन जिल्ह्यांतील २८७ संलग्न महाविद्यालये व सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांचे विद्यापीठ नॅकच्या ‘ए++’ मानांकनासह (३.५२ सीजीपीए) अग्रेसर असून, संशोधन, स्टार्टअप परिसंस्था, नवे अभ्यासक्रम आणि क्रीडा क्षेत्रातील यशाचा त्यांनी आढावा घेतला .
​दीक्षान्त भाषणात जनरल जे. जे. सिंग यांनी स्नातकांना ‘विकसित भारत २०४७’ च्या उभारणीत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.  "पद कितीही मोठे असले तरी कर्तव्य हेच सर्वोच्च असते," असा संदेश देत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीमूल्यांचा आणि चारित्र्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यास सांगितले. त्यांनी ग्रामीण भागातील प्रश्न, स्थानिक नवोन्मेष आणि समाजाभिमुख कार्यासाठी ज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला दिला.
​अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, सेमीकंडक्टर आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतानाच करुणा व सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन त्यांनी केले. कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरातील शेती, सहकार, वस्त्रोद्योग आणि पारंपरिक उद्योगांच्या प्रगतीसाठी विद्यापीठाने अधिक भरीव भूमिका घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.

​या सोहळ्यात सर्वसाधारण कौशल्याचे ‘भारताचे राष्ट्रपती सुवर्णपदक’ तनुजा बाजीराव साळोखे हिला, तर ‘कुलपती सुवर्णपदक’ वेदिका उमेश कदम हिला प्रदान करण्यात आले. माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांना विशेष सन्मान श्रेणीसह राज्यशास्त्राची पीएच.डी. पदवी देण्यात आली. विविध विद्याशाखांच्या पीएच.डी. आणि पदवीधर स्नातकांचा गौरव करण्यात आला  कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes