SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून शेंडा पार्क परिसराची पाहणीडी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा चित्रे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथमपुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे महाराष्ट्र दिनी वितरणप्रलंबित अत्याचार प्रकरणांचा वेळेत निपटारा करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडगोकुळ बाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच : भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलमहाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडगोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहितीनृत्य: मानवी भावनांचा लयबद्ध आविष्कारकृषी निविष्ठा विक्री व्यावसायिकांचा संप मागे

जाहिरात

 

प्रलंबित अत्याचार प्रकरणांचा वेळेत निपटारा करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

schedule29 Apr 26 person by visibility 147 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. त्यांनी प्रलंबित प्रकरणांचा विहीत मुदतीत निपटारा करण्याचे आवाहन केले.

बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभागाला प्रलंबित प्रकरणे निर्धारित मुदतीत न्यायालयात सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच एक वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा सखोल आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पोलीस तपासावर असलेल्या 22 प्रकरणांपैकी 8 प्रकरणांत दोषारोप पत्र दाखल झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 अंतर्गत दाखल प्रकरणांमध्ये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेल्या पात्र प्रकरणांबाबत तसेच न्यायालयात प्रलंबित प्रकरणांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

या बैठकीस पोलीस उपअधिक्षक तानाजी सावंत, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा पाटील, पोलीस निरीक्षक पुष्पा किर्दत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी पुष्कराज गर्दे, एलसीबी पथकाचे निवृती माळी, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रतिभा जाधव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अभिजीत खोत तसेच अशासकीय सदस्य संजय कांबळे व संतोष तोडकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes