पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे महाराष्ट्र दिनी वितरण
schedule29 Apr 26 person by visibility 154 categoryराज्य
कोल्हापूर : सदविचार, धर्मनिष्ठा, त्याग, समर्पण, दुरदर्शी धोरण अशा सर्वगुणसंपन्न स्त्रियांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. या सर्वाभिमुख व्यक्तीमत्वाचा आदर्श जोपासून स्त्रियांनी पुढे यावे यासाठी महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या समाजसेविकांच्या व संस्थांच्या कामाची नोंद घेऊन त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जिल्हास्तरावर प्रदान करण्यात येतो.
पुरस्कार प्राप्त समाजसेविका यांना महाराष्ट्र दिनी छत्रपती शाहू स्टेडीयम येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी सन 2020-21 साठी शोभादेवी पाटील,मु.पो.भादोले,सन 2021-22 साठी राजश्री साकळे,कोल्हापूर, सन 2022-23 साठी वर्षा पाटील मु.पो.म्हाकवे व सन 2023-24 या वर्षासाठी आनंदा शिंदे, मु.पो.राशिवडे बु. यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी 10,001/- रुपये, स्मृतिचिन्ह,शाल सन्मानपत्र व श्रीफळ प्रदान करण्यात येणार आहे.