डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम; गुणवंतांचा सन्मान सोहळा उत्साहात
schedule25 Jun 25 person by visibility 401 categoryशैक्षणिक

कोल्हापूर: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीने उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांनी विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये उल्लेखनीय यश मिळविले. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, इन्स्टिट्यूटच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला.
यावेळी कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगमधील प्रथम, तृतीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू प्रदान करून त्यांचे कौतुक करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना गावडे यांनी, " शॉर्टकट न घेता आणि कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून ध्येयप्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहिल्यास उल्लेखनीय यश प्राप्त होते. गुणवंत विद्यार्थ्यांनी समाजासाठी उपयुक्त कार्य करत रहावे. आधुनिक माध्यमांचा वापर करून व्यक्तिमत्व सक्षम करावे" असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांनी इन्स्टिट्यूटमध्ये राबविले जात असलेले विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, मेंटोरशिप प्रोग्रॅम, अकॅडमिक नियोजन, फीडबॅक सिस्टीम, उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण इत्यादी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. उपस्थित विद्यार्थी आणि पालक यांनी इन्स्टिट्यूटविषयी कृतज्ञता व्यक्त करताना आपले अनुभव आणि भावना व्यक्त केल्या. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यावेळी रजिस्ट्रार अमित आव्हाड, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले. पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी आभार मानले. प्रा. सुदर्शन महाडिक यांनी सूत्रसंचालन केले.
गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
तृतीय वर्ष : कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ( प्रतिक सचिन कुंभार 98.94%, नागेश शिवसांब गुडाळे 96.82%, कौस्तुभ चंद्रशेखर नागवेकर
97.18%) ए आय एम एल (पाटील नंदिनी प्रभाकर 97.28%, यादव देविका आनंदा 92.39%, कुंभार विनायक हरिभाऊ 92.11%) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (जाधव सृष्टी चंद्रकांत 91.5% ,पाटील दिशा सुदाम 9.63% ,देवार्डेकर दिया नागेश 84.75%) सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रीदेवी नायर 92.16%, अल्झरीन बांगी 91.74%, नेहा माळी 88.32%) मेकॅनिकल इंजिनिअरिंग (सोहम सतीश सूर्यवंशी 88.26%,क्रिश उमेश पाटील 88.15%,वीरेंद्र राजाराम पाटील 87.38%)
द्वितीय वर्ष: कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (नरके समृद्धी काशिनाथ 94.41%, भांदिगरे वैष्णवी संजय 90.70%,आडनाईक श्रावणी संभाजी 89.94%) ए आय एम एल (तानिया काटिगर 92%, श्रीनेश राऊळ 89.22%, अनुष्का ओतारी 88.11%) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (नीदा जकाते 82.12%, विद्या पवार 80.59%, प्रणव पारधी 77.77%) सिव्हिल इंजिनिअरिंग (प्रसाद पाटील 79.78%, , शुभम पाटील 79.56%, पार्थ यादव 79.44%) मेकॅनिकल इंजिनिअरिंग (सृष्टी देसाई 86.67%, सनराज पाटील 85.89%, सार्थक मोरे 79.44%)
प्रथम वर्ष: - कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (श्रेयस माळवदकर 93.29%, पायल पाटील 92.12%, अधिराज कोळेकर 91.88%, रुमैसा यादवाड 87.06, आर्या पोवार 85.65%, स्वरा भोरे 84.24%) ए आय एम एल (दिशा तिवारी 92.59%, रिधिमा बुधले 91.18%, दिव्या पाटील 88.52%) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (प्रणव माने 84.82%, राजवीर पाटील 83.77%, गुरुनाथ पाटील 81.77%) सिव्हिल इंजिनिअरिंग (हर्षदा यादव 80.90%, अनुष्का पाटील 77.60%, नारायणी सुतार 75.90%) मेकॅनिकल इंजिनिअरिंग (ईशांत पोवाळकर 77.22%, केदार सावंत 76%, तन्मयी पाटील 75.11%)