SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ. रईसा मुल्ला यांना पीएच.डी. पदवी प्रदानअब्दुललाटच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५८२ नागरिकांची तपासणीगोकुळची दूध दरवाढ तातडीने रद्द करा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन; प्रांत उपभोक्ता संरक्षण परिषद समितीच्या पूनमताई तोडकर यांचा इशारागोरगरिबांच्या आशीर्वादाने माझी नोका पैलतीराला लागेल; मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गारकोल्हापूर शहरातील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या चार आस्थापना सीलसंयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे स्मरण: महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनअपघातात मृत सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहणार : मंत्री हसन मुश्रीफ यांचा दिलासा३४ जणांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया; आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या १६ हजार ७०१ वरचांगल्या जीवनशैलीतून सामाजिक शांतता, राष्ट्रउभारणी शक्य : डॉ. बी. आर. कोरेकामचुकार अधिकाऱ्यांवर हक्कभंग, विरोधकांना ३० वर्षांचा जाब; आमदार राजेश क्षीरसागर यांचा कोल्हापूर महापालिकेत कडक इशारा!

जाहिरात

 

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ. रईसा मुल्ला यांना पीएच.डी. पदवी प्रदान

schedule21 Nov 26 person by visibility 130 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या विभागप्रमुख डॉ. रईसा मुल्ला यांनी  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांचा संशोधन विषय  “मशीन लर्निंगचा वापर करून मधुमेही आणि मधुमेह नसलेल्या रुग्णांमधील कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूच्या जोखमीचे मूल्यांकन”  असा होता. या संशोधनासाठी त्यांना भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. आर. देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

 या संशोधनामध्ये कोविड संसर्गाचा मधुमेही तसेच मधुमेह नसलेल्या रुग्णांवर होणारा परिणाम आणि त्यांच्यातील मृत्यूची संभाव्य जोखीम यांचा मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या आधारे अभ्यास करण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.

डॉ. रईसा मुल्ला यांच्या या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ यांनी  अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes