परदेशी शिक्षणाच्या स्वप्नांना मिळाले बळ
schedule01 Oct 26 person by visibility 113 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, साईनाथ कॉलनी व मराठा कॉलनी येथे राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन मेलबर्न विद्यापीठ व सिडनी विद्यापीठ येथे एम.एस. अभ्यासक्रमासाठी रवाना होणारे प्रथमेश वाघवडे व वैष्णवी सातपुते यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. परदेशी उच्च शिक्षणाच्या संधी, शिष्यवृत्तीची प्रक्रिया व आवश्यक तयारी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे विविध प्रश्न उपस्थित करून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या संवादामुळे विद्यार्थिनींच्या परदेशी उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना नवी दिशा व आत्मविश्वास मिळाला. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थिनी उच्च शिक्षणाची नवी क्षितिजे गाठतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.