SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा; आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणीशेतकऱ्यांनी घाबरू नये, सरकार पाठीशी; लवकरच दुष्काळ जाहीर होणार : हसन मुश्रीफमोफत आरोग्यसेवेसाठी अद्ययावत फिरता दवाखाना सुरू; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण‘श्री गणेशा आरोग्याचा 2.0’ अंतर्गत 1 हजार 88 आरोग्य शिबिरेसत्यशोधक समाज: समता आणि सुधारणेचा क्रांतिकारी सरनामाचित्रनगरीत विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘सेट’मागचे जगहादक! कानातील हेडफोनमुळे १७ वर्षीय तरुणीचा रेल्वे धडकेत जागीच मृत्यू; इचलकरंजी हादरलीशिरूर हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ७४ वर्षीय वृद्ध महिलेचा जीव गेला; रोहिदास नगरात संतापाची लाटगोकुळ निवडणूक: अर्जांच्या छाननीत दिग्गजांना दणका; अर्ज अपात्र ठरले तरी काहींना दिलासा, अंतिम चित्र गुरुवारी स्पष्ट होणार कोल्हापूर जिल्ह्यात अनंत चतुर्दशी विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था; ४ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात!

जाहिरात

 

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा; आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी

schedule24 Sep 26 person by visibility 165 category

कोल्हापूर : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी ते कागलदरम्यान महामार्गाचे रुंदीकरण व इतर कामे सुरू आहेत. गोकुळ शिरगाव परिसरात महामार्गाचे काम सुरू असताना वारंवार अपघात होत असल्याने कामगारांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी आयटक संलग्न गोकुळ दुध संघ   कर्मचारी संघटनेने केली आहे.

गोकुळ शिरगाव एमआयडीसी तसेच कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते. महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी गोकुळ दूध संघाचे कर्मचारी कै. रामचंद्र सदाशिव पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेनंतर कामगार वर्गात नाराजी निर्माण झाली असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीसंदर्भात दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रकल्प संचालक जी. पी. बैरवा यांना निवेदन देण्यात आले. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI कार्यालयात हे निवेदन देण्यात आले.

महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने न केल्यास नाईलाजास्तव राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी लक्ष्मण पाटील, शाहीर सदाशिव निकम, व्ही. डी. पाटील, संभाजी शेलार, दत्तात्रय बच्चे, संदेश पाटील, योगेश चव्हाण, प्रविण करडे, विजयकुमार कांबळे आणि वैभव पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes