ई-पिक पाहणी विहीत कालावधीत पूर्ण करा : पणन महासंघाचे शेतकऱ्यांना आवाहन
schedule26 Aug 25 person by visibility 157 categoryराज्य

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांनी आपल्या पिकाची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन पणन महासंघामार्फत करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने हंगाम 2025-26 मध्ये निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार राज्यात नोडल व NCCF च्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मुग, उडिद, सोयाबीन व तुर) खरेदी करण्यात येणार आहे. आधारभुत दराने खरेदी करण्यासाठी ई-पिक पाहणी असलेला 7/12 उतारा आवश्यक आहे.
तसेच खरेदी प्रक्रिया हि शेतक-यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी जी.एन.मगरे यांनी दिली आहे.