कोल्हापूर : पाचगावात बंदुकीचा धाक दाखवून धमकावणारे तीघे जण ताब्यात
schedule26 Aug 25 person by visibility 316 categoryगुन्हे

कोल्हापूर : पाचगावात बंदुकीचा धाक दाखवुन धमकावणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून ६,१५,५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली. याप्रकरणी रणजित राजाराम गवळी अरुण संभाजी मोरे , चेतन राजाराम गवळी अशी त्यांची नावे आहेत
२५ ऑगस्ट रोजी रात्री बळवंतनगर मित्र मंडळ पाचगाव मंडळाची गणेश आगमन मिरवणूक ही सहजीवन सोसायटी परिसरात आलेली असताना मिरवणुकीमध्ये ऋषिकेश भोसले रा. पाचगाव याचा रणजित गवळी, चेतन गवळी व त्याचा मित्र अरुण मोरे यांचेसोबत किरकोळ वाद झाला. त्यानंतर पुन्हा मिरवणुक सुरु झाली, ऋषिकेश भोसले हा रात्री ०१.३० वा चे सुमारास घरी जात असताना रणजित गवळी व त्याचा मित्र अरुण मोरे यांनी त्याचेकडील वॅगन आर कार मधुन येवुन रणजित मोरे याने त्याचेकडील बंदुक घेवुन ऋषिकेश भोसले याचे डोक्याला बंदुक लावुन ठार मारण्याची धमकी दिली. व ते तेथुन निघुन गेले. त्यानंतर ऋषिकेष भोसले याने करवीर पोलीस ठाणे आज 26 ऑगस्ट रोजी तक्रार दिलेने करवीर पोलीस गुन्हा नोंद झाला आहे.
तपास पथकाने आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी वॅगन आर वाहनासह तिघांना याचेकडील बंदुकीसह ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार , अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी धीरज कुमार , यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अमंलदार प्रविण पाटील, सत्यजित तानुगडे, दिपक घोरपडे, अरविंद पाटील यांनी केली आहे.