कळंबा परिसरात गॅस पाईपलाईन जोडणीच्या दिवशीच स्फोट; दोन लहान मुलांसह चौघे गंभीर; कंपनी विरोधात संताप
schedule26 Aug 25 person by visibility 207 categoryगुन्हे

कोल्हापूर : कळंबा जेल परिसरातील एलआयसी कॉलनीमध्ये सोमवार रात्री 11 च्या सुमारास घरगुती गॅसमध्ये स्फोट् झाला. यामध्ये दोन लहान मुलांसह चार जण जखमी झाले.
शहरामध्ये थेट गॅस पाईपलाईनने गॅस पुरवठा सुरू झाला आहे. नुकताच कळंबा जेल परिसरातील एलआयसी कॉलनीमध्ये सुद्धा थेट गॅस पाईपल्याने गॅस पुरवठा सुरू आहे. सोमवार रात्री अकरा वाजण्याची सुमारास येथील शितल भोजने यांच्या घरामध्ये गॅसमधून अचानक स्फोट झाला. यामध्ये त्यांच्यासह एक महिला आणि दोन लहान मुले जखमी झाले. अनंत भोजणे (वय ६०), शीतल अमर भोजणे (२९), प्रज्ज्वल अमर भोजणे (साडेपाच वर्षे) आणि इशिका अमर भोजणे (३) अशी जखमींची नावे आहेत.
घरामधील साहित्याची नुकसान झाले आहे. स्फोट झाल्याने खिडक्यांच्या काचाही फुटले आहेत. घरातील बसण्यासाठी असणारा कोच सुद्धा जळाला आहे. याची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. स्थानक प्रमुख जयवंत देशमुख यांच्यासह जवान येथे आले. त्यांनी स्थिती नियंत्रणात आणली.