SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना मंत्रिमंडळ बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजलीमहर्षी शिंदे यांच्याकडून अस्पृश्यतेच्या प्रश्नाची सैद्धांतिक मांडणी: संपत देसाई"वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रम डॉ. बापूजी साळुंखे इंजीनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहातराष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मेहबूब शेख नववर्षासोबत गडचिरोलीत विकासाची नवी पहाट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ताराक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरणतात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मध्ये ‘इंडस्ट्री रेडी इंजिनिअर्स’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजनराधानगरी : कासारपुतळेतील जवान प्रमोद पाटील यांच्यावर अंत्यसंस्कारनागरिकांमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती होण्यासाठी दुचाकी रॅलीचे आयोजन भारतीय भूचुंबकत्व संस्थेच्या सहकार्याने विद्यापीठात शुक्रवारी राष्ट्रीय कार्यशाळा; बदलत्या वातावरणाचा सखोल अभ्यास शक्यपर्व महिला सक्षमीकरणाचे...

जाहिरात

 

शैक्षणिक धोरण व पायाभूत शिक्षणाची भूमिका

schedule30 Dec 24 person by visibility 186 categoryशैक्षणिक

एकविसाव्या शतकामध्ये दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानाची अभूतपूर्व स्वागत होत आहे. त्यामुळे शिक्षणावर दोन प्रमुख जबाबदाऱ्या येऊन पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षणाने सक्षमपणे व मोठ्या प्रमाणावर नव्याने निर्माण होणाऱ्या ज्ञानाचे व स्वीकारलेल्या ज्ञानाचे व संस्काराचे संक्रमण केलेच पाहिजे .कारण भविष्यातील कौशल्यांचा तो पाया ठरत असतो. भविष्याच्या दृष्टिकोनातून पाहता पारंपारिक शिक्षणाचे प्रतिसाद हे संख्यात्मक आणि ज्ञानावर आधारित असतात हे उपयुक्त ठरू शकत नाहीत . कारण प्रत्येक लहान मुलाला त्याच्या जीवनात अगदी लहान वयात सर्व प्रकारचे ज्ञान व ज्ञानाचे भांडारे उपलब्ध  करून देणे इतकेच पुरेसे नाही तर त्यास आचरण करणे शिक्षणाची संधी घेण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे त्याने त्याच्या स्वतःच्या ज्ञानाचे कौशल्याचे व सतत बदलणाऱ्या अनेक घटकांचा संबंध आपल्या सभोवताली असलेल्या व इतर जगाशी संबंध जुळवून घेत त्या गोष्टी त्याला शिकल्या पाहिजे आहेत.शैक्षणिक धोरण मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षणाच्या चार स्तंभांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.

 शिक्षण तज्ञ डॉलर्स कमिशन यांनी शिक्षणाचे चार स्तंभ मानलेले आहेत त्यामध्ये पहिला आहे.
 १)माहितीसाठी अध्ययन 
2)कृतीसाठी अध्ययन 3 )एकीच्या भावनेने जगण्यासाठी अध्ययन 4 )मानव बनण्यासाठी अध्ययन.
हे स्तर मानत असताना प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासामध्ये त्याच्या मनाचा शरीराचा ,बुद्धिमत्तेचा ,संवेदनशीलतेचा ,सौंदर्यदृष्टीचा तसेच व्यक्तिगत जबाबदारीचा आणि अध्यात्मिक मूल्यांचा विकास समाविष्ट केला आहे.एकूणच एकविसाव्या शतकातील आदर्श नागरिक बनवणे याला फार महत्व दिले आहे. तसेच मानवता नष्ट होणार नाही याचीही काळजी घेतली आहे. सध्या समाजाकडे डोळे उघडून पाहिले तर संवेदनशीलता सौंदर्यदृष्टी यांचे अस्तित्वच माणसामधून निघून जात आहे अशी भावना दिसत आहे. म्हणून शिक्षणाने ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा विचार त्याचे मत,भावना आणि कल्पना यांच्या स्वातंत्र्याचा वापर करणे हे शिकवणे जसे गरजेचे आहे. तसेच त्याने आपली बुद्धिमत्ता सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्याकडे लक्ष दिले पाहिजेत त्यासाठी बालकाचा पायाभूत स्तर हा अत्यंत शैक्षणिक धोरणामध्ये व पूर्वीपासून मानला गेला आहे. त्याच्या जीवनातील पहिली आठ वर्षे मेंदूच्या विकासासाठी करतील साठी विचार करण्यात आला आहे 80 ते 85 % पेक्षा जास्त विकास वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत होतो वयाची तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर लहानपणके आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण कार हा बालवाडी किंवा अंगणवाडी म्हणजेच पूर्व प्राथमिक शाळा यामध्ये घालवतो वयाच्या तिसऱ्या वर्षा पर्यंत त्याच्या सभोवतालची घरातील वातावरण हे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षण यांचा पाया तयार करते तसेच पोषक आहार आरोग्याच्या चांगल्या सवयी सुरक्षा आणि संरक्षण इत्यादी त्याची संस्कार पूर्ण पायाभरणी होत राहते खेळ हालचाल संगीत ध्वनी दृष्टी स्पर्श प्रेरणा म्हणजेच बौद्धिक विकास बोधात्मक विकास सामाजिक भावनिक संख्यात्मक व संख्याज्ञान यांचा सर्वांगीण विकास त्यात अभिप्रेत केला आहे. पायाभूत स्तरावर बालके हे शिकत असताना क्रियाशील असतात.
नवीन शिक्षण व ज्ञान घेण्यास उत्कृष्ट असतात उत्सुक असतात बालकांकडे सभोवताची जग जाणून घेण्याची उपयुक्तता असते कुवत असते, उत्सुकता असते त्याच्या अंतरिक मनातून तो प्रश्न विचारतो नाविन्याचा शोध घेतो त्यामधून त्याचे शिकणे सुरूच राहते बालके ही करती आणि खेळातूनच आनंद घेत असतात पायाभूत स्तरावर पायाभूत स्तरावरील बालकांचे अध्ययन त्याचे असंभव होत आले असणारे व्यक्ती मित्राच्या संबंधित निगडित असते म्हणून तो हितसंबंध जो पणे आवश्यक गरजेचे आहे असे वाटते त्यामुळे बालके स्वतःला सुरक्षित समजतात तसेच ते जिज्ञासु, आशावादी व सुसंवादी विचार प्रक्रियेमध्ये राहतात. बालकांना खेळ आवडतो त्या खेळाच्या माध्यमातून तो सामाजिक संवाद साधण्यास व अध्ययन सक्षम होण्यास त्याला संधी मिळते खेळाच्या माध्यमातून खेळत असताना त्याची ध्येय खेळाचे आश्चर्य तो केंद्रित करत असतो खेळातील आनंद हा बालकांना स्वतःमध्ये आनंदी राहण्यासाठी व खेळण्यासाठी अतुर असतात बारके जे करतात ते आवडीने करतात त्यामधून अर्थपूर्ण सामाजिक आंतरक्रिया घडून येण्यास मदत होते त्यास अनेक संधी मिळत राहतात बालके ही स्वतःमध्येच आनंदी राहत असतात आणि खेळत असतात ते खेळताना कोणतीही क्रिया करताना आवडीने करतात त्यामुळे त्याची सामाजिक आंतरक्रिया घडवून येत राहते या कृती मधून त्याला जगाची जाणीव होऊन तो स्वतःबद्दल शिकतो भाषा गणित या सर्व गोष्टी शिकत असताना अध्ययन आणि विकास यांचा केंद्रबिंदू खेळ आहे.

अध्ययन कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, नवनिर्मिती व समस्या निराकरण यांना नैसर्गिक व वास्तववादी साहित्यांच्या वापराने विकसित होण्याची संधी दिल्यामुळे त्यांचे खेळणे आणि खेळकरपणा अधिक समृद्ध होतो.
पायाभूत स्तरावरील बालकांचे अध्ययन त्यांच्या सभोवताली असणाऱ्या व्यक्ती सोबतच्या हितसंबंधांशी निगडित असते, म्हणून असे हितसंबंध जोपासणे आवश्यक असते. यामुळे बालके स्वतःला सुरक्षित समजतात, तसेच ते आशावादी, जिज्ञासू व सुसंवादी होतात.

▪️विद्यार्थी जीवनात खेळाचे महत्त्व
बालकांना निसर्गतः खेळायला आणि त्यात सक्रिय राहायला आवडते. खेळणे आणि शिकणे ही द्विमार्गी परस्परावलंबी प्रक्रिया आहे. खेळामुळे बालकांना इतर प्रौढांशी आणि बालकांशी सामाजिक संवाद साधण्यास व अध्ययन सक्षम होण्यास संधी मिळते.
जेव्हा आपण खेळात गुंतलेली बालके पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येते, की :
अ) खेळात पर्यायांची निवड करण्यास वाव आहे बालके जेव्हा खेळत असतात, तेव्हा ती त्यांचे ध्येय निवडतात व त्याची निश्चिती करतात. (उदा., मला कोडे पूर्ण करायचे आहे, ब्लॉकचा टॉवर बनवायचा आहे किंवा बाहुलीघरात चहा बनवायचा आहे). या प्रकारे निवड त्यांना सक्रिय आणि व्यस्त ठेवते.


ब) खेळात आश्चर्य आहे खेळ हे बालकांना विचार करण्यास आणि लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करतात. (उदा. फुगा इतका मोठा होत आहे, पतंग आकाशात किती दूर गेला आहे, रुमाल कुठे गायब झाला आहे ही जादू आहे का?).
क) मुले आनंदाने खेळ खेळत असतात. बालके ही स्वतःमध्येच आनंदी रहात असतात आणि खेळण्यासाठी आतुर असतात. बालके जे जे करतात, ते आवडीने करतात. त्यातून अर्थपूर्ण सामाजिक आंतरक्रिया घडून येतात व शिकत राहण्याची इच्छा वृद्धिंगत होते. या कृतींमधून, बालके जगाची जाणीव करून घेणे, समस्या सोडवणे, स्वतःबद्दल शिकणे, इतरांबद्दल शिकणे आणि भाषा व गणित या सर्व गोष्टी शिकत असतात. अशा प्रकारे बालकांचे अध्ययन आणि विकास यांचा केंद्रबिंदू खेळ हा आहे. विकासाची सर्व क्षेत्रे व अभ्यासक्रमाची सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी खेळ हे बालकांना अनेक संधी उपलब्ध करून देतात. निवड, आश्चर्य आणि आनंद हे बालकांच्या खेळाचे प्रमुख पैलू आहेत. निवड, आश्चर्य आणि आनंद या तीन पैलूंच्या आधारे बालकांची वर्गांतर क्रिया अधिक उत्तम होणे सुलभ होईल.

बालके खेळताना सक्रिय असतात: सभोवतालच्या जगाशी आंतरक्रिया करून त्याची अनुभूती घेत असताना, माहितीची मांडणी करतात, नियोजन करतात, कल्पना करतात, बदल सुचवितात, परस्परांबद्दल मते मांडतात, विस्तार करतात, शोध घेतात आणि नवनिर्मिती करतात.
खेळताना बालके एक योजना बनवितात आणि त्याचे अनुसरण करतात मला माझे घर आणि कुटुंबाचे चित्र काढायचे आहे ते कसे दिसेल आणि मी चित्रात कोणाचा समावेश करावा?
 प्रयत्नप्रमाद, कल्पनाशक्ती आणि समस्या निराकरणाची कौशल्ये वापरून शिकतात माझा मनोरा सतत पडतोः कदाचित मला तळात आणखी ठोकळे ठेवण्याची गरज आहे का?

प्रमाण, विज्ञान आणि हालचाल या संकल्पनांचे वास्तविक जीवनात उपयोजन करतात वाळूत बोगदा करण्यासाठी मला वाळूत किती प्रमाणात पाणी घालावे लागेल. तयार केलेल्या बोगद्यातून पाय किती हळूवार काढून घ्यावा लागेल,
तर्कसंगत, विश्लेषणात्मक पद्धतीने कारणमीमांसा करतात चित्रकोडी सोडवताना, प्रथम चौकटीवरील तुकड्यांपासून सुरुवात करणे चांगले असू शकते.

मित्रांशी संवाद साधतात, त्यांच्याशी आंतरक्रिया करतात आणि नव्या दृष्टिकोनातून मतभेदांवर चर्चा करतात यावेळी मला डॉक्टरची भूमिका करायची आहे, कदाचित पुढच्या वेळी तुम्ही ही भूमिका करू शकता? 
मुलांना कामातून किंवा कार्यपूर्ततेतून समाधान मिळवतात मी माझ्या मित्रासोबत हा वाळूचा किल्ला पूर्ण केला
सर्जनशील होतात जेव्हा मी लाल आणि निळा रंग मिसळतो, तेव्हा जांभळा रंग तयार होतो, जेव्हा मी हिरवा आणि निळा रंग मिसळून तेव्हा काय होईल ?

 खेळा‌द्वारे अध्ययन
राज्य अभ्यासक्रम आराखडा, हा अभ्यासक्रम रचनेच्या पद्धती, अध्यापनशास्त्र, वेळ, आशय संघटन आणि बालकाच्या एकूण अनुभवांसाठी संकल्पनात्मक, क्रियात्मक आणि व्यवहारात्मक दृष्टिकोनांच्या केंद्रस्थानी खेळण्याचे महत्त्व यावर भर दिला गेला आहे.
प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन में शिक्षणाच्या संदर्भात 'खेळणे' या शब्दामध्ये बालकासाठी मनोरंजक आणि गुंतवून ठेवणाऱ्या सर्व कृतांचा समावेश होतो, यामध्ये शारीरिक खेळ, परस्परसंवाद, संभाषण, प्रश्नोत्तर सत्रे, कथा सांगणे, मोठ्याने वाचन करणे आणि सामायिक वाचन, बडबडगीते किंवा खेळ, खेळणी, दृश्यकला आणि संगीत यांचा अभिनयाचा समावेश असलेल्या इतर आनंददायक वातावरणात कृती असू शकतात
खेळ बालकांना क्रियाशील ठेवून, शिकण्याच्या संधी प्रदान करून, त्यांना चालना देतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने आयोजित केले जाऊ शकतात.
अ) मुक्त शिक्षण 
१) बालकांना कोणता खेळ व  काय खेळायचे आहे, त्यांना ते कसे खेळायचे आहे आणि किती वेळचे सर्वांचे संस्थात्मिकीकरण व्हावे आया बरोबर सामाजिक क्षमता, संवेदनशीलता, चागले वर्तन, सौजन्य, नैतिकता, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता, गटकार्य आणि सहकार्य वृत्ती विकसित करण्यावर भर दयावा.
 (NEP २०२०, परिच्छेद १.२) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार स्तर वय वर्षे ३ ते ८ असा असेल. या पाच वर्षांच्या शालेय शिक्षणात, पूर्व शालेय शिक्षणातून इयत्ता दुसरीपर्यंतचे शिक्षणसमाविष्ट आहे, म्हणून वयाची ६ वर्षे पूर्ण असलेली बालके पहिलीत असावीत.

▪️मार्गदर्शक तत्वे
  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार, पायाभूत स्तरासाठी मार्गदर्शक तत्त्वे
१) जन्माची परिस्थिती किंवा पार्श्वभूमी काहीही असली, तरी प्रत्येक बालक शिकण्यास सक्षम असते.
२) प्रत्येक बालक वेगळे आणि स्वतःच्या गतीने वाढते, शिकते आणि विकसित होते.
३) बालके उत्तम निरीक्षण कौशल्य असणारी नैसर्गिक संशोधक असतात. ती स्वतः शिकण्याच्या
अनुभवांची निर्माती असतात आणि विविध प्रकारे आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात.आजची बालके ही उद्याच्या भारतातील समाजाचा घटक आहेत; ती निरीक्षण, अनुकरण आणि सहकार्य यांद्वारे शिकतात. बालके प्रत्यक्ष अनुभवांतून, त्यांच्या ज्ञानेंद्रियांचा वापर करून आणि पर्यावरणाबरोबर आंतरक्रिया करून शिकतात.
४) बालकांचे अनुभव आणि अध्ययनाच्या पद्धती स्वीकारल्या पाहिजेत. जेव्हा बालकांचा आदर केला जातो, त्यांना महत्त्व दिले जाते, शिक्षण प्रक्रियेत त्यांचा पूर्ण सहभाग घेतला जातो, तेव्हा ती उत्तम प्रकारे शिकतात.
५) खेळ आणि कृती हे बालकांच्या शिकण्याचे आणि विकासाचे प्रमुख मार्ग आहेत. बालकांना वातावरणाचा अनुभव घेण्याची, शोध घेण्याची आणि प्रयोग करण्याची संधी मिळावी.
६) विकासात्मक आणि सांस्कृतिकदृष्ट्या योग्य असलेली सामग्री, तसेच बालकांना संकल्पनांचे आकलन व समस्या निराकरण क्षमता विकसनासाठी कृती आणि वातावरण यांमध्ये बालकांचा सहभाग घेतला पाहिजे.
७) शिक्षकांनी बालकांच्या अनुभवांतून आशय तयार केला पाहिजे. आशयाची नावीन्यता किंवा त्यातील आव्हाने, बालकांच्या परिचित अनुभवांवर आधारित असावीत.
८) बालकांच्या विकासाच्या गरजांनुरूप आशय असावा. कला, संगीत, कल्पना रंजक खेळ, गोष्टी सांगणे यांसाठी त्यांना अनेक संधी दिल्या जाव्यात.
९) आशयामध्ये लिंग, जात, वर्ग आणि दिव्यांगत्व यांसारख्या मुद्द्यांसाठी समानतेवर भर दिला पाहिजे.
१०) शिक्षकांनी बालकांचे सुलभक म्हणून काम करावे. मुक्त प्रश्न विचारून, शोध घेण्याच्या प्रवृत्तीला चालना देऊन, बालकांना साहाय्य करावे.
११) कुटुंब व समाज हे दोन्ही या प्रक्रियेतील भागीदार असून, त्यांना विविध मार्गांनी सहभागी करून घ्यावे.
१२) बालशिक्षण केंद्रांत बालकांची काळजी घेतली जाते. परिचित प्रौढांकडे बालके सहजपणे काळजीवाहक म्हणूनच पाहतात. शिक्षक हा बालकांच्या गरजा आणि भावनिकतेप्रती संवेदनशील आणि जबाबदार असावा. वर्गातील कृतींमध्ये शिकण्याच्या भावनात्मक पैलूंवर भर असावा. (उदा., अभिनय कलेचा उपयोग करून गोष्ट सांगणे,)
इत्यादी अध्ययन व अध्यापन प्रक्रियेतून विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांची भूमिका फक्त योग्य मार्गदर्शक मित्र व सुलभकतेचे दिशादर्शक कार्य करायचे आहे. 

एकूणच शैक्षणिक गुणवत्ता तपासताना विद्यार्थ्यांना कौशल्यधिष्ठित अभ्यासक्रम देऊन एकविसाव्या शतकात सामर्थ्यवान बनण्यासाठी सक्षम करायचे आहे.
हे कार्य काही एका दिवसात एका महिन्यात होणार नाही त्यासाठी शिक्षक पालक व मित्र यांनी त्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांची स्वप्ने ,इच्छा ,ध्येय व धोरणे मोठी आहेत का ते तपासून पाहणे गरजेचे आहे. सध्या कौशल्याधिष्ठित म्हणजेच त्या विद्यार्थ्याला कोणते क्षेत्र आवडते कोणत्या क्षेत्रामध्ये त्याचा जास्तीत जास्त कल आहे ते पाहून त्यास मार्गदर्शन करण्याचे कार्य आहे त्यामुळे तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यास त्याला दिशा मिळणार आहे. त्याचे त्याला चांगले सवय लावून स्वतःवर लक्ष केंद्रित त्यांनी केले पाहिजेत. सकाळी लवकर उठणे,सखोल वाचन करणे, स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देणे ,ध्यानधारणा करणे अशा  छोट्या मोठ्या गोष्टी त्यांनी सवयी आपल्या अंगी लावणे गरजेचे आहे, त्यासाठी त्याने जिद्द चिकाटी व सातत्य हे राखले पाहिजेत तरच त्याला आपल्या स्वप्नांची नवी पहाट दिसणार आहे. याची सुरुवात बालवाडी म्हणजेच पूर्व प्राथमिक स्तरापासून सुरुवात करणे महत्वाचे आहे. मूलभूत शिक्षण त्यास आत्मसात झाले तरच तो भविष्यकालीन शिक्षण घेण्यास सक्षम राहणार आहे.

✍️ डॉ. अजितकुमार पाटील , कोल्हापूर.
( लेखक मराठी साहित्यातील -  पीएच,डी. धारक आहेत )

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes