SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कागल तालुक्यात गोबरगॅसच्या खड्डयात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यूराज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या; मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, मंत्रीमंडळ बैठकीत आढावामनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक ११ कसबा बावडा येथे नवागतांचे स्वागतविकसित कृषी संकल्प अभियानातर्गत ९० गावातील १८ हजार शेतकऱ्यांशी संवाद; डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रमार्फत मार्गदर्शनआषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रणसार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन आढळल्यास दंड, 23 जून रोजी विशेष मोहीमकोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची 23 जून रोजी सभाअभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेविषयी शनिवारी शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन सेमिनारराज कपूर यांच्या स्मृती दिनानिमित्त कराओके गाण्यातून वाहिली श्रदांजली मुस्लीम समाजातील मुलींनी संशोधन क्षेत्रात भरारी घ्यावी : गणी आजरेकर

जाहिरात

पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सोमवारी बैठक

schedule03 Jun 25 person by visibility 238 categoryराज्य

कोल्हापूर : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक माहे जून 2025 या महिन्याच्या दुस-या सोमवारी 9 जून 2025 रोजी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, विधानभवन येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती अपर आयुक्त, (महसूल) तथा विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती पुणे विभाग पुणेचे सदस्य सचिव महेश पाटील यांनी दिली आहे.

प्रत्येक तीन महिन्यातून एकदा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक आयोजीत केली जाते. तीन महिन्यांत समितीकडे आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाय योजनांबाबत पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची आढावा बैठक नियमितपणे घेण्यात येते. 

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक सर्वसाधारणपणे तीन महिन्यानंतरचे पुढील महिन्याच्या दुस-या सोमवारी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर आयोजित करण्यात येते.

जाहिरात

Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes