रंकाळा उद्यान व परिसरातील मुख्य रस्त्यांच्या स्वच्छता मोहिमेस उत्सफुर्त प्रतिसाद
schedule15 Feb 25 person by visibility 679 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने संपुर्ण रंकाळा उद्यान व परिसरातील मुख्य रस्त्यांची आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेस उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला आहे. हि स्वच्छता मोहिम प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आली. आज शनिवारी सकाळी 7 ते 9.30 वाजेपर्यंत हि स्वच्छता मोहिम सुरु होती. या मोहिमेचा प्रारंभ रंकाळा टॉवर जाऊळाचा गणपती येथील चौकातून करण्यात आला. रंकाळा टॉवर येथून डी मार्ट उद्यान या परिसराची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी स्वच्छता करुन पाहणी केली.
यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मुलांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यानंतर माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शपथ घेण्यात आली. महापालिकेचे नवीन अत्याधुनिक बहुउद्देशीय स्प्रेअर आणि डस्ट सप्रेशन वाहनाद्वारे रंकाळा टॉवर ते फुलेवाडी पर्यंत रस्त्यावर व डिवायटरवर या मशिनद्वारे पाणी मारण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेमध्ये अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्त नेहा आकोडे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्रे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन एस पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, रमेश कांबळे, सुरेश पाटील, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, वैद्यकिय अधिकारी विद्या काळे,
पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, शहर समन्वयक हेमंत काशीद व मेघराज चडचणकर, आरोग्य स्वच्छता विभाग, जनसंपर्क, नगरसचिव, विधी, विवाह नोंदणी, परवाना, एलबीटी, जनगणना, रेकॉर्ड, विभागीय कार्यालय क्र.1, 2, पवडी अकौंट, आरोग्य प्रशासन, पंचगंगा हॉस्पीटल, नगदी, भांडार, उद्यान, घरफाळा, ब्युरो, मुख्य लेखापरिक्षक कार्यालय, मुख्य लेखापाल कार्यालय, पाणी पुरवठा, ड्रेनेज, नगररचना, भास्करराव जाधव वाचनालय, एन.यु.एल.एम. विभागाकडील सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग नोंदविला.