कोल्हापुरातून सकल मराठा समाजातर्फे जीवनावश्यक वस्तू मुंबईस पाठवणार
schedule30 Aug 25 person by visibility 121 categoryसामाजिक

कोल्हापूर : मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनास कोल्हापुरातून मोठया प्रमाणात रसद पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून आंदोलक शेवटच्या टप्प्यापर्यंत मुंबई सोडणार नाहीत. जनतेच्या पाठिंब्यावर कोल्हापूर येथून किमान १ ट्रक जीवनावश्यक वस्तू येत्या दोन दिवसात पाठवायचे नियोजन करण्यात आले. कोल्हापुरत शाहू स्मारक भवन येथे सकल मराठा समाजाची बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबई येथे आमरण उपोषणाला आझाद मैदानावर बसले आहेत. मराठा समाजाचा प्रचंड झंजावत आंदोलन स्थळी असून, आंदोलकांना प्राथमिक सुविधा देणे राज्य सरकारची व प्रशासन जबाबदारी असताना देखील कोणत्याही सुविधा न देता आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. आंदोलनांच्या पहिल्याच दिवसापासून परिसरातील हॉटेल दुकाने बंद करून अन्न पाणी मिळू नये अशी व्यवस्था केली आहे.
मोठे प्रमाणात पाऊस अन् दुसऱ्या बाजूला सेवा सुविधांचा वानवा यामध्ये मराठा आंदोलकांना कोंडीत अडकून आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न आहे. हजारो गाड्यांना पार्किंगचे योग्य मार्गदर्शन न करता वाहनधारकांनी प्रचंड यातायात करून वहाने चूकीच्या मार्गाने वळवून आंदोलक आझाद मैदान येथे न पोचतील असा प्रयत्न केला आहे. मराठा सेवकांचे प्रचंड हाल करून त्यांना मुंबई सोडून जाण्याविषयी प्रयत्न प्रशासन करत आहे.
या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये कोल्हापूर येथून किमान १ ट्रक जीवनावश्यक वस्तू पाठवणे तसेच आझाद मैदानाची परवानगी मुदत देण्याचा घोळ न घालता संपूर्ण कालावधीसाठी परवानगी द्यावी. प्रशासनाने आझाद मैदान परिसरात अन्न पाणी व राहण्यासाठी प्राथमिक शाळा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. अशीही मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.
या प्रसंगी मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, चंद्रकांत पाटील, उमेश पवार, रुपेश पाटील, राजू सावंत, संदीप देसाई शाहीर दिलीप सावंत, राहुल इंगवले, बाबा महाडिक, शैलजा भोसले, सुनिता पाटील, सुधा शिंदे, गीता हसुरकर, बबिता जाधव निलेश चव्हाण, अनिल घाटगे, उदय लाड यासह मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.