SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी : वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ3 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली 'सतेज मॅथ्स स्कॉलर' परिक्षा१३ डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान तडजोड प्रकरणे स्वीकारली जाणार नाहीत; नागरिकांनी अफवांना बळी पडू नयेशिवाजी विद्यापीठात दिव्यांगांसाठी करिअर गाईडन्स, सांस्कृतिक कार्यक्रममहाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त विद्यापीठात दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजनडीकेटीईचा देशपातळीवरील आयआयसी मीट मध्ये बेस्ट पोस्टर पुरस्काराने सन्मानभ्रष्टाचार निर्मूलन संदर्भातील "चला भ्रष्टाचार संपवूया" जागरुकता कार्यशाळेचा व्यापारी-उद्योजकांनी लाभ घ्यावाकोल्हापूर : शूटिंग रेंजचे खाजगीकरण होणार नाही : जिल्हाधिकारी अमोल येडगेकोल्हापुरात माजी महापौर सई खराडे, शिवतेज खराडे, इंद्रजीत आडगुळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशध्वज दिन निधीला हातभार लावूया… सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.. !

जाहिरात

 

3 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली 'सतेज मॅथ्स स्कॉलर' परिक्षा

schedule07 Dec 25 person by visibility 180 categoryशैक्षणिक

🔸डी. वाय.पाटील इंजिनीअरिंग कॉलेज, साळोखेनगरमध्ये आयोजन

कोल्हापूर : साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सतेज मॅथ्स स्कॉलर परिक्षा उत्साहात संपन्न झाली.  कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून बारावी विज्ञान शाखेतील 110 महविद्यालयांमधून 3285 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.
    
डी. वाय पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या 7 वर्षांपासून ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करून या विषयाची आवड निर्माण व्हावी व पुढील परीक्षांचा उत्तम पाया रचला जावा यासाठी हि परीक्षा घेतली जाते. रविवार 7 डिसेंबर रोजी ही परीक्षा संपन्न झाली. परीक्षेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना नेण्या-आणण्याच्या सुविधेसोबत भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. 
     
 या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेनंतर होणाऱ्या एमएचटी-सीईटी (MHT-CET) क्रॅश कोर्स ला सहभाग नोंदवण्यासाठी सुलभ होणार आहे. त्याचबरोबर बारावी बोर्ड व सीईटी (CET) व जेईई (JEE) परीक्षेसाठीसुद्धा  या परीक्षेचा अनुभव उपयुक्त ठरणार आहे. परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षेनंतर आयआयटी (IIT) च्या तज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन करण्यात आले व गणित विषयाला उपयुक्त अशा नोट्स देण्यात आल्या.

परीक्षेतील प्रश्नांमधील विविधता, परीक्षेची काठीण्यपातळी व परीक्षेचा आयोजनाबद्दल विध्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. नोंदणी न केलेल्या विध्यार्थ्यांना परीक्षेदिवशी महाविद्यालयामध्ये थेट नाव नोंदणी करण्याची सुविधा करण्यात आली.


डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी परिक्षास्थळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच सायन्स कॉलेज प्रतिनिधींशी संवाद साधून उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, कार्यकारी संचालक डॉ.अनिलकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले. कॅम्पस संचालक डॉ.अभिजीत माने,प्राचार्य डॉ. सुरेश डी. माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. सर्व ऍडमिशन समन्वयक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes