SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात खड्डे बुजविण्यासाठी ‘इन्स्टा रोड पॅचर’चा प्रयोगकोल्हापूर महानगरपालिकेतील रिक्त पदे त्वरित भरा; आस्थापना खर्चाची अट शिथिल करा: आमदार सतेज पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी‘गुजरीचा गोविंदा’ च्या ४० व्या वर्षा निमित भव्य कार्यक्रम - बिग बॉस मराठी फेम इरिनासह नामवंत कलाकारांची उपस्थिती; लाखाचे भव्य पारितोषिक अन् आकर्षक कार्यक्रमांची मेजवानीउंचगाव येथे वीज बिल भरणा केंद्र तातडीने सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा शिवसेनेचा इशाराजागतिक कीर्तीचे तज्ज्ञ वारणेत आणणार : एन. एच. पाटील; कोरे अभियांत्रिकीत प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागतमराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागरआंतरराष्ट्रीय ओव्हरडोझ जनजागृती दिन: व्यसनमुक्ती आणि संवर्धनाचा संदेशजिजाऊ बसमुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल : आमदार यड्रावकररक्षाबंधन प्रेम, श्रद्धा, समता आणि संरक्षणाची भावना दृढ करण्याचा दिवस : मुनिश्री सारस्वत सागरजी महाराजऑलिपिकवीर खाशाबा चरित्र सर्वांना नेहमी प्रेरणादायी : पै. विष्णु जोशीलकर

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिकेतील रिक्त पदे त्वरित भरा; आस्थापना खर्चाची अट शिथिल करा: आमदार सतेज पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

schedule31 Aug 26 person by visibility 174 categoryराज्य

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेतील तांत्रिक संवर्गातील रिक्त पदांमुळे शहराचा विकास आणि दैनंदिन नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता महानगरपालिकेतील अत्यावश्यक व तांत्रिक सेवेतील पदे भरण्यासाठी ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल करावी, अशी  मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

​आमदार सतेज पाटील यांनी निवेदनात म्हंटले आहे की, शासनाने १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुधारित आकृतिबंधातील वर्ग १ ते ४ मधील एकूण ४,४४५ पदांच्या आकृतिबंधास मान्यता दिली आहे. मात्र, सन २०१७ पासून महानगरपालिकेतील तांत्रिक पदे कायमस्वरूपी भरण्यात आलेली नाहीत.
 
सेवानिवृत्तीमुळे सध्या तांत्रिक संवर्गातील तब्बल ८० टक्के पदे रिक्त आहेत. सध्या तांत्रिक संवर्गात केवळ २३ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यावर बांधकाम परवाने, लेआऊट मंजुरी, अतिक्रमण कारवाई, गुंठेवारी नियमितीकरण आणि रस्ते दुरुस्ती यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामांचा अतिरिक्त भार पडत आहे. परिणामी, नागरिकांची मोठी गैरसोय होत असून महापालिका प्रशासनाला मूलभूत सेवा-सुविधा पुरवण्यात मर्यादा येत आहेत.

​महापालिका प्रशासनाने गट 'अ' ते गट 'डी' मधील अत्यावश्यक पदे भरण्यासाठी ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव ११ मार्च २०२६ रोजी नगरविकास विभागाच्या (नवि-२) अपर मुख्य सचिवांकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, जेणेकरून रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा होईल आणि शहरातील विकासकामांना गती मिळेल, असे आमदार सतेज पाटील यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes