SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मिशन लक्षवेध अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकासघरगुती-व्यावसायिक गॅस पुरवठा सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कंपन्यांना निर्देशट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील जीएसटी रद्द करावा, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणीपायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी यशस्वीरीत्या संपन्नकोल्हापूर : घरफाळा सवलत योजना 80 टक्के सवलतीचा शेवटचा दिवसमहाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अर्थसहाय्य योजनापी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्हाभर राबविणार : मंत्री हसन मुश्रीफ 'सेवर्ड्स फॉली': एका 'मूर्खपणाच्या' कराराने अमेरिकेला कसं बनवलं महासत्ता?सांगरुळ येथील सराफ लूटप्रकरणी कोल्हापूर गुन्हे शाखेकडून दोन आरोपींना अटक; ११ लाखांचा मुद्देमाल जप्तस्वच्छता मोहिमेत 8 टण प्लॅस्टिक, तणकट व खरमाती उठाव

जाहिरात

 

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अर्थसहाय्य योजना

schedule30 Mar 26 person by visibility 78 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, अमृतच्या लक्षित गटातील, (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी, इत्यादी) उमेदवारांना 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी व मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी उत्तीर्ण उमेदवारांना प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य' (सन 2025-26) योजना राबविण्यात येत आहे.

सन 2025-26 मध्ये महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 उत्तीर्ण झालेल्या आणि आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी संबधितांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर सुचनांचे पालन करत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. 

योजनेविषयी भविष्यात कोणतीही माहिती, सूचना केवळ अमृतच्या संकेतस्थळावरच प्रसिद्ध करण्यात येतील. योजनेच्या अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी काही शंका असल्यास संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.

या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी 10 हजार रुपये व मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी 5 हजार रुपये  इतके प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार असून ऑनलाइन संकेतस्थळावर 27 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) चे व्यवस्थापकीय संचालकांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes