SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सांगरुळ येथील सराफ लूटप्रकरणी कोल्हापूर गुन्हे शाखेकडून दोन आरोपींना अटक; ११ लाखांचा मुद्देमाल जप्तस्वच्छता मोहिमेत 8 टण प्लॅस्टिक, तणकट व खरमाती उठावविद्यार्थ्यांनी संशोधनातून कृषी क्षेत्राला नवी दिशा द्यावी : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे​"मारो फिरंगी को!" – १८५७ च्या क्रांतीचा पहिला हुंकार देणारे 'आद्य क्रांतिकारक' मंगल पांडे यांना विनम्र अभिवादन! पल्स २०२६ मुळे आरोग्य क्षेत्राला नवी दिशा; परिषदेत १५ सामंजस्य करार, ७२० कोटींची गुंतवणूक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​"मुस्लिम ओबीसी आरक्षणाचे जनक हाजी शब्बीर अन्सारी यांना कोल्हापुरात भावपूर्ण श्रद्धांजली"उद्योग परवानग्यांमध्ये सुलभतेसोबत महाराष्ट्रात वीजदरातही टप्प्याटप्प्याने घट होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसइतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांचे अर्ज सादर करण्यास मुदतवाढकोल्हापुरात ११ एप्रिलपासून 'भीम फेस्टिव्हल'चा जागर; डिगे फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सन्मान

जाहिरात

 

सांगरुळ येथील सराफ लूटप्रकरणी कोल्हापूर गुन्हे शाखेकडून दोन आरोपींना अटक; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

schedule29 Mar 26 person by visibility 108 categoryगुन्हे

कोल्हापूर : सांगरुळ (ता. करवीर) येथील एका सराफ व्यावसायिकाला मारहाण करून दागिने आणि रोकड लुटणाऱ्या दरोड्याच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ५१ ग्रॅम सोन्याची लगड, ११९ ग्रॅम चांदी आणि दोन दुचाकी असा एकूण ११ लाख १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शुक्रवार पेठ, कोल्हापूर येथे राहणारे फिर्यादी तेजाराम पेराजी माळी यांचे सांगरुळ येथे 'लक्ष्मी ज्वेलर्स' नावाचे दुकान आहे. २१ मार्च २०२६ रोजी रात्री दुकान बंद करून घरी परतत असताना, सांगरुळ स्मशानभूमीजवळ अज्ञात इसमांनी त्यांची मोटारसायकल अडवली. आरोपींनी फिर्यादीचे हातपाय बांधून त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडील दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली होती. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस अंमलदार अरविंद पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, रंकाळा येथील पतौडी घाटावर सापळा रचून प्रवीण ओबाराम माळी (वय २३, रा. कोल्हापूर, मूळ रा. राजस्थान) आणि खुशबू जसराज परमार (वय ३०, रा. राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले.


मुख्य आरोपी प्रवीण माळी हा आर्थिक अडचणीत होता. त्यानेच आपल्या ओळखीच्या तेजाराम माळी यांची रेखी करून आपल्या साथीदारांच्या मदतीने हा कट रचल्याची कबुली दिली. चोरलेले दागिने वितळवून त्याच्या लगडी तयार करण्यात आल्या होत्या. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत चोख कामगिरी बजावली असून, उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes