SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती करा ; रस्ता सुरक्षा समितीची राज्य सरकारला सूचनाभाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा - सुविधा तयार करा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या १० विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती; महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार; ४० ते ९५ लाखांची शिष्यवृत्ती महाविकास आघाडी स्वाभीमानीसह जिल्ह्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूका एकत्र लढणार : आमदार सतेज पाटीलखासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून मंजुर झालेल्या विकासकामांचा युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रारंभइंद्रधनुष्य युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाला उपविजेतेपद; तीन सुवर्णपदकांसह १६ पारितोषिके प्राप्तकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचा ऊस दर प्रतिटन एफआरपी अधिक २०० रूपये जाहीरइचलकरंजीत यूनिटी मार्चला उत्स्फूर्त प्रतिसादडी वाय पाटील कृषी महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांचे राज्यसेवा परीक्षेत यशसंजय घोडावत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ १२ नोव्हेंबरला

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा : कागल तालुक्यातील शिंदेवाडी येथे पहिलीच (वैरण बँक) कंपनी स्थापन

schedule08 Jul 23 person by visibility 1748 categoryउद्योग

🔴 गावोगावी वैरण बँक स्थापन होणे ही काळाची गरज : अरुण डोंगळे

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या कोल्हापूर (गोकुळ )च्या ताराबाई पार्क कार्यालय येथे शिंदेवाडी तालुका कागल येथिल स्थापन झालेल्या कोल्हापूर वैरण उत्पादन कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र  गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते संस्थेस देण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन योगेश खराडे,  व संचालक उपस्थित होते.

यावेळी बोलताना  संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळ ने नेहमीच विविध योजनांच्या माध्यमातून दुध उत्पादकांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. दुग्धव्यवसायामध्ये सकस वैरणीचे महत्व फार आहे. वैरणीचे योग्य नियोजन करणे ही काळाची गरज असून, दुध उत्पादकांना वैरणीची सहज उपलब्धता व्हावी. या उद्देशाने  केंद्र शासन व एन डी डी बी च्या सहकार्याने १०० कंपन्या (वैरण बँका) स्थापन करण्याची योजना राबविली जात असून यायोजने अंतर्गत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात  केंद्र शासन व एन डी डी बी मार्फत (वैरण बँक) कागल तालुक्यातील शिंदेवाडी येथे पहिलीच कंपनी (वैरण बँक)  स्थापन झाली असून या कंपनीच्या माध्यमातून दुध उत्पादकांना कमीत कमी दरामध्ये ओला व सुका चारा उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे .तसेच लहान शेतकऱ्यांना वैरणीची बाजारपेठ उपलब्ध करून देणे , तरुण दूध उत्पादकांना उद्योजक बनिविणे हा आहे. या कंपनीच्या माध्यमातून हिरवा चारा निर्मिती, खरेदी,विक्री सायलेज निर्मिती विक्री,असे व्यवसाय व कार्य संस्थेच्या माध्यमातून होणार आहेत, या मुळे दुग्धव्यवसाय वाढीस चालना मिळणार असल्याने गावोगावी वैरण बँका स्थापन होणे हि काळाची गरज आहे असे मनोगत व्यक्त केले.

   या कार्यक्रमावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ उदयकुमार मोगले, डॉ दयावर्धन कामत,  भरत मोळे,  योगेश खराडे, पुंडलिक खराडे, पांडुरंग ढेरे, महेश पाटील, प्रवीण आरडे,शशी गुजर ,योगेश तळेकर, सतीश चौगुले, अजित मोरबाळे, एकनाथ पवार, तानाजी खराडे,सुहास खराडे ,ज्योतीराम कुंभार, तसेच शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes