एम .एड व बी .एड –एम .एड (एकात्मिक ) साठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२६
schedule13 Feb 26 person by visibility 85 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: शिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे एम .एड व बी .एड –एम .एड (एकात्मिक ) अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. एम .एड या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर व डी.एल .एड किंवा बी.एड उत्तीर्ण असणे वर्षाची अंतिम परीक्षा दिलेली आहे असे विद्यार्थी एम .एड साठी पात्र आहेत.
त्याचप्रमाणे बी .एड –एम .एड (एकात्मिक ) या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवी परीक्षेच्या अंतिम परीक्षा दिलेली आहे असे विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या स्टेट कॉमन एट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेद्वारे प्रवेश घेऊ शकतात.
या प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२६ असून प्रवेश परीक्षा फॉर्म ची लिंक: https://cetcell.mahacet.org/आहे अधिक माहिती करिता शिक्षणशास्त्र अधिविभागास संपर्क साधावा असे आव्हान अधिविभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले आहे.