बी.एस्सी.बी .एड् ((ITEP) साठी नॅशनल कॉमन एट्रन्स टेस्ट (NCTE) अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२६
schedule13 Feb 26 person by visibility 69 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे बी.एस्सी. बी.एड् (ITEP) या एकात्मिक चार वर्षाच्या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे.
बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण किंवा ज्यांनी बारावी विज्ञान शाखेची आताच परीक्षा दिलेली आहे असे विद्यार्थी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या नॅशनल कॉमन एट्रन्स टेस्ट (NCTE) देवून सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.
या प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२६ असून प्रवेश परीक्षा फॉर्म ची लिंक: https://exams.nta.ac.in/NCTE/ आहे अधिक माहिती करिता शिक्षणशास्त्र विभागास संपर्क साधावा असे आव्हान विभाग प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले आहे.