कळंबा ग्रामपंचायत येथे सरपंच सुमन गुरव यांच्याहस्ते ध्वजारोहण
schedule15 Aug 23 person by visibility 665 category
कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त कळंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'माझी माती, माझा देश' या अभियानांतर्गत ग्रामपंचायतीतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये गावातील हुतात्मा झालेल्या शहिदांच्या शिलाफलकाचे उद्घाटन माजी सैनिक कॅप्टन तानाजी रेडेकर यांच्या हस्ते झाले. तसेच सरपंच सुमन गुरव, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
आज झालेल्या ध्वजारोहण समारंभामध्ये उपसरपंच स्नेहल जाधव, गटनेते उदय जाधव, माजी सरपंच विश्वास गुरव, ग्रामपंचायत सदस्य रोहित मिरजे, संदीप पाटील, विकास पोवार, नितीश शिंदे, स्वरूप पाटील, दीपक तिवले, रोहित जगताप, भाग्यश्री पाटोळे, पुनम जाधव, छाया भवड, मीना गौंड, दिपाली रोपळकर, वैशाली टिपुगडे, आशा टिपुगडे, संगीता माने, तसेच ग्रामविकास अधिकारी दिलीप तेलवी, प्रकाश खडके, दत्तात्रय तिवले, विशाल सोनुले, अमोल पाटील, निवृत्ती चौगुले, ग्रामस्थ उपस्थित होते.