व्हिंटेज ‘टर्न टेबल शिडी’ वाहनाचे अग्निशमन सेवेतील पुनरागमन गौरवास्पद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule26 Jan 26 person by visibility 72 categoryसामाजिक
▪️बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे अनावरण
मुंबई :बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे ‘टर्न टेबल शिडी’ अग्निशमन वाहना’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले.
ऐतिहासिक वारसा लाभलेले १९३७ मधील ‘टर्न टेबल शिडी अग्निशमन वाहन’ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दल सेवेत पुन्हा दाखल होत आहे ही बाब मुंबईकरांसाठी गौरवास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, उद्योजक गौतम सिंघानिया व मान्यवर उपस्थित होते.