७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापूर सर्किट बेंच येथे राष्ट्रध्वजवंदन
schedule26 Jan 26 person by visibility 70 categoryसामाजिक
कोल्हापूर : ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उच्च न्यायालयात मुंबई अधिनस्त असलेल्या सर्किट बेंच (कोल्हापूर) येथे प्रमुख न्यायमूर्ती आर जी अवचट यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती एन बी सूर्यवंशी , न्यायमूर्ती अजित कडेठाणकर , न्यायमूर्ती वृषाली जोशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रारंभी पोलीस विभागाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.याप्रसंगी न्यायमूर्ती श्री अवचट यांनी उपास्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त तथा प्रशासक के.मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती, प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश, इतर न्यायाधीश, जेष्ठ विधीज्ञ यांच्यासह सर्किट बेंचचे इतर कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.