SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘गोकुळ’च्या चेअरमनपदी माजी आमदार राजेश पाटील यांची निवडकोरे अभियांत्रिकीमध्ये पीबीएल दिन उत्साहात गोकुळ'च्या अध्यक्षाची आज हायव्होल्टेज निवडणूक; शासननियुक्त संचालकांमुळे राजकीय संघर्ष टोकालाशांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन: विज्ञान, शांतता आणि मानवी प्रगतीचा संगमएकमेकांच्या हातात हात घालून दुष्काळावर मात करूया : पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटीलऊस तोड मजुरांच्या कुटुंबियांसमवेत खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांची दिवाळीगोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन होण्याचा मार्ग मोकळा?अध्यादेशाच्या विरोधात कोल्हापुरात पेटला सहकाराचा असंतोष; 'गोकुळ'वरील सरकारचा डाका खपवून घेणार नाही!सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामातील साखर पोत्याचे नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पूजन‘गोकुळ’वर शासननियुक्त सदस्यांचा घाला; सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात विराट ‘संघर्ष मोर्चा’!

जाहिरात

 

‘गोकुळ’च्या चेअरमनपदी माजी आमदार राजेश पाटील यांची निवड

schedule10 Nov 26 person by visibility 147 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाच्या चेअरमनपदी माजी आमदार  राजेश नरसिंगराव पाटील यांची बहुमताने निवड झाली. अध्यासी अधिकारी तथा विभागीय अधिकारी करवीर उपविभाग करवीर श्रीमती मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली सभेत ही निवड करणेत आली. या चेअरमन पदाच्यानिवडीकरीता सुचक म्हणून –  अजित शशिकांत नरके व अनुमोदक म्हणून – चेतन अरुण नरके आहेत.

  यावेळी अध्यासी अधिकारी तथा विभागीय अधिकारी करवीर उपविभाग करवीर श्रीमती मोसमी चौगुले, करवीर तहसीलदार स्वप्निल पवार, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करवीर प्रेम राठोड, संचालक अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील चुयेकर, विरेंद्र मंडलिक, राहुल पाटील (सडोलीकर), चेतन नरके, अंबरिषसिंह घाटगे, अजित नरके, किसन चौगले, मदन देसाई, रणजितसिंह पाटील, बाबासाहेब चौगले, रणजितसिंह कृ.पाटील, राहुल देसाई, विद्याधर गुरबे, अजित पाटील, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, बाबासाहेब देवकर, विश्वजीत जाधव, राजूबाबा आवळे, शशिकांत खोत, बयाजी शेळके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ.भाग्यश्री डोंगळे, शासननियुक्त संचालक शिवाजी आडनाईक, डॉ.प्रविणचंद्र हेंद्रे, अॅड. प्रशांत पाटोळे, कृष्णात पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes