पिरामल स्वास्थ्य व सनोफी यांच्या मार्फत कळंबा गावात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
schedule13 Aug 25 person by visibility 247 categoryआरोग्य

कोल्हापूर : कळंबा तर्फ ठाणे (ता. करवीर) येथे पिरामल स्वास्थ्य व सनोफी यांच्या मार्फत आज दि. 13 ऑगस्ट रोजी महालक्ष्मी तालीम हॉल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते, या शिबिरामध्ये 30 वर्षांवरील सर्व नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. या मध्ये मुख्यतः उच्च रक्तदाब व मदुमेह यांची मोफत तपासणी करण्यात आली या मध्ये ६० पेक्ष्या जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविला.
संस्थेचा मुख्य उद्देश हा जास्तीत जास्त नवीन नागरिकांचे स्क्रीनिंग करून त्यांना लवकरात लवकर उच्च रक्तदाब व मधुमेह याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे व त्यांना आरोग्य सेवे पर्यंत पोहोचवणे आहे. त्याचबरोबर समाजामध्ये उच्च रक्तदाब व मधुमेह या आजाराची जनजागृती करणे.
या पुढील 6 महिने ही सेवा महिन्यातून 1 वेळा गावात येऊन नागरिकांचे आरोग्य तपासणी करणार आहे. तसेच या शिबिरामध्ये कोल्हापूर आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले.
यावेळी कळंबा ग्रामपंचायत सदस्य रोहित मिरजे, विकास पवार- बावडेकर, संदीप पाटील, कोल्हापूर महानगरपालिका पाणीपुरवठा कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन उत्तम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. पिरामल स्वास्थ सनोफी या संस्थेचे कोऑर्डिनेटर मयूर कुकडे यांच्या मार्गदर्शनानुसार कम्युनिटी मोबिलायझर संदीप खोत तसेच नर्सिंग स्टाफ जाग्रुती कदम कादंबरी कवठणकर गाडी पायलट अक्षय तोरस्कर तसेच सरकारी रुग्णालय डॉ. स्नेहल महाडिक सर्व आशावर्कर, उपस्थीती होते.