महापालिकेच्या शाळेतील 44 हजार विद्यार्थ्यांच्या मोफत पाठयपुस्तकांची उचल
schedule14 May 24 person by visibility 297 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने समग्र शिक्षा अभियानांतर्गंत 193 शाळांतील सुमारे 44 हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तकांचे वितरण शाळेच्या पहिल्याच दिवशी करण्यात येणार आहे. यासाठी बालभारतीकडून सर्व इयत्ता निहाय, माध्यमिक निहाय व विविध विषय निहाय पाठयपुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
ही मोफत पाठयपुस्तके बालभारती येथून वाहतुक करुन आणण्यात येत आहेत. याचा शुभारंभ प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, प्राथमिक शिक्षण समितीकडील कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, विषय साधनव्यक्ती श्रावण कोकीतकर, व्यवस्थापक किशोर पाटील यांच्या उपस्थित करण्यात आला.
शहरातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये व त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विविध योजना महापालिका समग्र शिक्षा अभियानांतर्गंत राबवित आहे. सन 2024-25 नवीन शैक्षणिक वर्षात नवीन पुस्तके, नवीन धडे, नवीन संकल्पना, नवीन सवंगडी सर्व कांही नाविन्याचा अनुभव देऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी बुक डे÷ साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या लाभापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये याची पुरेपूर दक्षता प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने घेण्यात येत आहे.