कोल्हापूरच्या जवानाला मणिपूरमध्ये वीरमरण
schedule14 Mar 25 person by visibility 112 categoryदेश

मुंबई : मणिपूर येथे भूस्खलनानंतर रस्ता तयार करण्याचे काम सुरु होते. त्याच दरम्यान सैन्यदलाच्या वाहनाचा मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवान सुनिल गुजर यांना वीरमरण प्राप्त झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की जवान सुनिल विठ्ठल गुजर (वय २७) हे मणिपूरमध्ये होते. तेथे भूस्खलनानंतर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असताना सैन्यदलाच्या वाहनाचा अपघात झाला. हे वाहन ८०० फूट खोल दरीत कोसळले. त्यात सुनिग गुजर यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव कोल्हापुरच्या शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर गावी पाठवले जाणार आहे.
जवान सुनिल गुजर यांच्या पश्चात त्यांचे आईवडील, भाऊ आणि सहा महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. अपघाताने गुजर परिवारावर मोठा धक्का बसला आहे.२०१९ मध्ये सुनिल गुजर यांनी भारतीय सैन्यामध्ये प्रवेश घेतला होता. पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप येथून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर गुजर यांची नियुक्ती ११० बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये झाली होती. कर्तव्य बजावत असताना अपघातात त्यांचे निधन झाले.