जी पी ए, निमा व निहा या असोसिएशनयांच्या संयुक्तपणे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात
schedule16 Aug 25 person by visibility 165 categoryसामाजिक

कोल्हापूर : जी पी ए, निमा व निहा या असोसिएशनतर्फे संयुक्तपणे ७९ वा स्वातंत्र्य दिन निमा हॉल येथे साजरा करण्यात आला. ध्वजारोहण सोहळा डॉ सुस्मिता गाडगीळ माजी नगरसेवक काकासाहेब पाटील, जीपीए अध्यक्ष डॉ. वर्षा पाटील, निमा कोल्हापूर अध्यक्ष डॉ. मुकुंद मोकाशी, निहा उपाध्यक्ष डॉ. सचिन भादवणकर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी जीपीए, निमा, निहा या संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम जीपीए अध्यक्ष डॉ वर्षा पाटील यांच्या हस्ते पार पडला. डॉ सुस्मिता गाडगीळ यांचा त्यांना शोधन लेप गोळी याला भारतीय सरकारचे पेटंट मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार जी पी ए अध्यक्ष डॉ वर्षा पाटील , निमा अध्यक्ष डॉ मुकुंद मोकाशी व निहा उपाध्यक्ष डॉ सचिन भादवणकर यांच्यातर्फे करण्यात आला. त्यानंतर देशभक्तीपर गाण्याचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजेश सोनवणे यांनी केले व आभार डॉ दीपक पवार व डॉ राजेश कुंभोजकर यांनी मानले.