कोल्हापुरात विनापरवाना बेकायदा रिव्हॉल्वरसह तीन जणांना घेतले ताब्यात
schedule16 Aug 25 person by visibility 225 categoryगुन्हे

▪️१,२०,५५०/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई
कोल्हापूर : विनापरवाना बेकायदा रिव्हॉल्वरसह तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १,२०,५५०/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने ही कारवाई केली.
तपास पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, विक्रमनगर परिसरामध्ये दोन इसम बेकायदेशिररित्या रिव्हॉल्वर बाळगून आहेत, मिळाले माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे पथकाने दि. १५ ऑगस्ट रोजी विक्रमनगर ते टेबलाईवाडी जाणारे रोडवरुन दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले, त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १ सद्दाम अलताफ गुडंवाडे (वय २८) व २) प्रथमेश सतिश पाटील (वय २७) त्यांची अंगझडती घेतली असता इसम नामे १) सद्दाम अलताफ गुडंवाडे याच्या कब्जात भारतीय बनावटीचे १,१०,०००/- रुपये किमंतीचे रिव्हॉल्वर मिळुन आले ते कायदेशिर प्रक्रिया करुन जप्त केले,
त्याचे रिव्हॉल्वर बाबत विचारणा केली असता त्याने सोबत असलेल्या प्रथमेश सतिश पाटील याचेकडुन घेतले असलेचे सांगीतले, त्यानंतर प्रथमेश पाटील यांचेकडे रिव्हॉल्वरबाबत अधिक चौकशी केली असता भारतीय बनावटीचे रिव्हॉल्वर हे त्यांनी संजय पाटील रा शिंगणापुर जि कोल्हापूर यांचेकडुन घेतलेचे सांगीतले, त्यानंतर तपास पथकाने इसम नामे संजय दादासो पाटील (वय ५६ रा. शिंगणापुर ता करवीर) यास शाहुपुरी कोल्हापूर येथुन ताब्यात घेतले व त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचे रिव्हॉल्वर आपले असुन त्याने ते त्याच्या आर्थिक अडचणीकरीता त्याचे ओळखीचा प्रथमेश पार्टील रा विक्रमनगर यास दिलेले होते व ते प्रथमेश पाटील याने सद्दाम गुंडवाडे याचेकड़े दिलेले होते. सदर रिव्हॉल्वरचे परवान्याबाबत संजय पाटील यांचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचा परवाना गेल्या काही वर्षापुर्वीच संपला आहे. अदयाप नुतणीकरण केलेला नाही असे सांगीतले, त्यानंतर तिन्हीं इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द राजारामपुरी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करणेत आला असुन अधिक तपास राजारामपुरी पोलीस ठाणेचे अधिकारी करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अमंलदार, वैभव पाटील, गजानन गुरव, योगेश गोसावी, विशाल खराडे, संतोष बरगे, शिवानंद मठपती, राजु कांबळे, अरविंद पाटील, प्रदीप पाटील, परशुराम गुजरे, सतिश सुर्यवंशी यांनी केली आहे.