SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; 'या' विषयावर सकारात्मक चर्चाआयआयसीटी फिल्‍म सिटीत जागा देणार, केंद्र सरकारकडून ४०० कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीस्वयंपूर्ण होण्यासाठी पुनर्वसन केंद्रातून मुला-मुलींना चांगल्या सेवा आणि शिक्षण द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगेसार्वजनिक वाचनालय, ग्रंथालयासाठी दर्जेदार दिवाळी अंक, कवितासंग्रह, कथासंग्रह भेट देणार : डॉ. सुनीलकुमार सरनाईकअंबाई टॅंकची दुरुस्ती करा : 'आप'चे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन उचगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात ‘टेक्नोवा’ सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना : उद्योजक सारंग जाधव; डी. वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये आयोजन जिल्ह्यातील तीन लाख मुलींना एचपीव्ही लस देण्यासाठी नियोजन करा : मंत्री, हसन मुश्रीफहोळी : आनंद, सौख्य, उत्साहपूर्ण सणपालकांनी आपल्या पाल्याची आरोग्य तपासणी करुन घ्यावी : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख

जाहिरात

 

स्तनाच्या कर्करोगावरील संशोधनासाठी विद्यापीठातील संशोधकांना जर्मन पेटंट

schedule13 Feb 25 person by visibility 273 categoryशैक्षणिक

▪️डॉ. शंकर हांगिरगेकर, डॉ. नवनाथ वळेकर, अक्षय गुरव, ललित भोसले यांची कामगिरी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी स्तनाच्या कर्करोगावरील उपचारांच्या अनुषंगागने केलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनास जर्मन सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे.

या संशोधन कार्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ. शंकर हांगिरगेकर यांच्यासह डॉ. नवनाथ वळेकर आणि संशोधक विद्यार्थी अक्षय गुरव, ललित भोसले यांनी सहभाग घेतला.

या संशोधनासंदर्भात डॉ. हांगिरगेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बायोमासमधील नैसर्गिक घटकांचा वापर करून फुरफुराल हा घटक वेगळा करून हायड्राझिनिल थायाझोल हे संयुग बनविण्यात संशोधनांतर्गत यश आले. हे संयुग स्तनाच्या कर्करोगावरील आधुनिक आणि प्रभावी उपचारांसाठी मोलाचे ठरणार आहे.

या संशोधकांनी विकसित केलेल्या संयुगामुळे स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवणे शक्य होणार असून पारंपरिक उपचार पद्धतीच्या दुष्परिणामांना आळाही बसेल. आजच्या जीवन शैलीमुळे स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका अधिकच वाढत चालल्याने यामुळे मृत्यूदरही अधिक आहे. सध्या या कर्करोगाच्या उपचारासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी, हार्मोनथेरपी, इम्युनोथेरपी अशा विविध प्रकारच्या उपचार पद्धती वापरात आहेत. परंतु या पद्धतींमध्ये रूग्णाला उपचारादरम्यान होणाऱ्या दुष्परिणामांना (साईड इफेक्ट्स) सामोरे जावे लागते. या संशोधनामुळे स्तनाच्या कर्करोगावरील उपचार पद्धती अधिक प्रभावी आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे, असे डॉ. हांगिरगेकर यांनी सांगितले.

गत वर्षी डॉ. हांगिरगेकर, गुरव आणि भोसले यांनी ग्राइंडस्टोन केमिस्ट्री वापरुन बायोमासपासून हायड्रॉक्झी मिथाईल फुरफुराल या मूलद्रव्यापासून नवीन हायड्राझिनिल थायाझोल संयुग तयार करण्याच्या शोधलेल्या पद्धतीला संयुक्त राष्ट्रांचे (यूके) पेटंटही प्राप्त झाले आहे. त्यापुढील टप्पा म्हणजे हे स्तनाच्या कर्करोगावरील त्याचे उपयोजन ठरले आहे.

सदरच्या संशोधनाबद्दल कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, व रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. कैलास सोनावणे यांनी संशोधक चमूचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes