SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कसबा कोडोली नगरपरिषद प्रस्तावावर उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; शासनाला सहा महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेशकोल्हापुरात २२ किलो गांजासह तिघांना अटक; १२ लाखांचा मुद्देमाल जप्तजागतिक सिकलसेल जागरूकता दिवस: एक गंभीर आरोग्‍य आव्हानकोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर विकास कामांच्या पार्श्वभूमीवर भव्य कृतज्ञता मेळाव्याचे आयोजनश्री अंबाबाई मंदिर परिसरातील विविध कामकाजाचा शुभारंभ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणारकोल्हापूर : पाण्यासाठी सभापती विशाल शिराळेंचा मध्यरात्रीपर्यंत ठिय्या; चंबुखडी टाकीवरून थेट नियोजनमाधुरीसाठी आंदोलन केलेल्या नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार : आमदार यड्रावकरकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहाडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या रणवीर पाटीलला १३.३६ लाखांचे पॅकेजकोल्हापुरात होणार 'श्री राम कथा' आणि 'श्री राम यज्ञा'चे भव्य आयोजन

जाहिरात

 

कोल्हापुरात २२ किलो गांजासह तिघांना अटक; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

schedule19 Jun 26 person by visibility 161 categoryगुन्हे

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नशामुक्त अभियानांतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत उजळाईवाडी (ता. करवीर) येथून २२ किलो गांजासह तीन इसमांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, उजळाईवाडी तलावाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत राजकिरण जयवंत मोरे (वय २६), संतोष दिनकर माने (वय ४७) आणि सोमनाथ रघुनाथ मंडले (वय ३६, सर्व रा. ता. पाटण, जि. सातारा) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ५ लाख ५० हजार रुपये किमतीचा २२ किलो गांजा, एक कार, एक स्पोर्ट्स बाईक आणि तीन मोबाईल हँडसेट असा एकूण १२ लाख १७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 याप्रकरणी गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes