SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ऐतिहासिक निर्णय : शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी प्रॅक्टिस बंदी कायमउत्तर ध्रुवाचा पाण्याचा तळ सर करणारी पहिली अण्वस्त्र पाणबुडी: 'यूएसएस नॉटिलायस'व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय चालवणारा मुख्य फरार आरोपी करवीर पोलिसांच्या जाळ्यातजयसिंगपूर येथे वित्तीय जागरूकता व साक्षरता कार्यक्रम संपन्नलिंगायत समाजाच्या न्याय्य मागण्यांना आमदार यड्रावकर यांचा जाहीर पाठिंबा कागलमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा अनावरण कार्यक्रम 'न भूतो न भविष्यति' करूया.... !जैन समाजाच्या हितासाठी व नवीन पिढीसाठी दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्वपूर्ण : पालकमंत्री प्रकाश आबिटकरराधानगरी भरले 99.51 टक्के; कोल्हापूर जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखालीकेंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख हजार कोटींचे कर वितरणगणित आणि संख्याशास्त्रामध्ये ‘एआय’चा पाया: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

जाहिरात

 

ऐतिहासिक निर्णय : शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी प्रॅक्टिस बंदी कायम

schedule03 Aug 26 person by visibility 116 categoryराज्य

मुंबई : उच्च न्यायालय, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी ३० जुलै २०२६ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी वैद्यकीय व्यवसाय (Private Practice) करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तयेच या विषयासंदर्भातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत.

मा. न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले की, शासन सेवेत कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा नियम व शासनाच्या धोरणानुसार बांधील असून, त्यांनी पूर्णवेळ शासकीय सेवा बजावणे अपेक्षित आहे. त्यामुळे शासकीय सेवेत असताना खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवानगी देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून, ग्रामीण व शहरी भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि रुग्णसेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या महत्त्वपूर्ण प्रकरणात शासनाच्या वतीने सहायक शासकीय अभियोक्ता अतुल काळे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तसेच, आरोग्य विभागाचे विधी सल्लागार ॲड. सतीश भेंडेकर यांनी कायदेशीर मुद्द्यांची मांडणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व समन्वय साधून शासनाच्या बाजूला परिपूर्ण सहकार्य केले.

कायदेतज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या मते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, शासकीय सेवेतील शिस्त, उत्तरदायित्व आणि रुग्णहिताला प्राधान्य देणारा हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes