SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डीकेटीईच्या टेक्स्टाईलमधील सात विद्यार्थ्यांची जॉर्डन येथील क्लासीक फॅशन ऍपेरिएल कंपनीत प्लेसमेंटपंचगंगा प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची कामे कोणत्याही परिस्थितीत मुदतीत पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगेविधानसभा निवडणूक : कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघातील ईव्हीएम मेमरी, मायक्रोकंट्रोलरची तपासणी, पडताळणी ...नामदेवरायांचे प्रतिभाशाली अभंगधनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने महा रक्तदान शिबिर उत्साहात विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कृषी क्षेत्रात सुधारणा आवश्यक : ऊरी रुबेनस्टेनअवैध सावकारांविरोधात कठोर कारवाई होणार : जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी प्राधान्यक्रम ठरवून सीएसआर मधून निधी आणूया : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, राजेश क्षीरसागरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंट मुंबईचे नुतन अध्यक्ष देवदत्त कल्याणकर शक्तीपीठाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यासाठीं, आमदार शिवाजी पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या डोक्यावर बंदूक ; आमदार सतेज पाटील यांचा आरोप

जाहिरात

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने महा रक्तदान शिबिर उत्साहात

schedule22 Jul 25 person by visibility 268 categoryसामाजिक

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस
यांचा आज दिनांक 22 जुलै रोजी वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महा रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे.या धर्तीवर आज भाजपा कोल्हापूर महानगरच्या वतीने शहरातील नऊ मंडलांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सेवा रुग्णालय कसबा बावडा, राधाकृष्ण मंदिर शाहुपुरी, महादेवराव जाधव वाचनालय टाकाळा, शिवाजी तरुण मंडळ शिवाजी पेठ, दैवज्ञ बोर्डिंग मंगळवार पेठ, नेहरूनगर सोसायटी हॉल, खेल खंडोबा मंदिर परिसर हॉल या ठिकाणी रक्तदान शिबिरे संपन्न झाली.या रक्तदान शिबिरांमध्ये नागरिकांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज दिवसभरात झालेल्या सर्व ठिकाणच्या रक्तदान शिबिरांमध्ये  500 हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज विविध ठिकाणी कॅम्पला भेटी दिल्या. याप्रसंगी आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष धीरज पाटील, सचिन कुलकर्णी, विशाल शिराळकर, राजगणेश पोळ, रविकिरण गवळी, प्रीतम यादव, विनय खोपडे, कोमल देसाई, सुनील पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून विराज चिखलीकर, आप्पा लाड, डॉक्टर राजवर्धन, रवींद्र पवार, नरेंद्र पाटील, नचिकेत भुरके, राहुल लायकर, जयराजसिंह निंबाळकर यांनी काम पाहिले.
याप्रसंगी राहूल चिकोडे, अशोक देसाई, गायत्री राऊत, हेमंत आराध्ये, रूपाराणी निकम, गिरीश साळोखे, विजय अगरवाल, गणेश देसाई, माधुरी नकाते, धनश्री तोडकर, सचिन पवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes