नूतन उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून अभिनंदन आणि शुभेच्छा
schedule10 Sep 25 person by visibility 263 categoryसामाजिक

कोल्हापूर : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन नवी दिल्लीत भेट घेतली. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाच्या उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्याबद्दल, खासदार महाडिक यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
अल्पावधीतच सी पी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ठळक कामगिरी केली होती. त्यानंतर त्यांना थेट एनडीए सरकार कडून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीए मधील सर्वच घटक पक्षांच्या पाठिंब्यामुळे, माननीय राधाकृष्णन भारताचे उपराष्ट्रपती बनले आहेत.
त्यांच्या कारकिर्दीत देशहिताची अनेक कामे मार्गी लागतील असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.