गोकुळ निवडणुक : स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या समाधीला माजी संचालकांचे अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला अभिवादन
schedule14 Sep 26 person by visibility 184 categoryउद्योग
चुये : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात मंगळवार दि. १५ पासून होत आहे. दरम्यान; अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला सोमवार दि. १४ गोकुळ दूध संघाच्या माजी संचालकांनी चुये ता. करवीर येथे जाऊन गोकुळचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या समाधीला मनोभावे अभिवादन केले. समाधीला पुष्पहार अर्पण करून हे अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार राजेश पाटील, विश्वासराव पाटील- आबाजी, अरुणराव डोंगळे, नविद मुश्रीफ, अजित नरके, युवराज पाटील -बापू, रणजितसिंह पाटील, प्रा. किसन चौगुले, डॉ. सुजित मिणचेकर, करणसिंह गायकवाड, एस.आर. पाटील, नंदकुमार ढेंगे, अशोक फराकटे आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.