SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कार्तिक शुद्ध एकादशी निमित्त निघालेल्या पालखी सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक यांचा सहभाग, वारकऱ्यांसमवेत भक्तीरसात तल्लीनसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ. रईसा मुल्ला यांना पीएच.डी. पदवी प्रदानअब्दुललाटच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५८२ नागरिकांची तपासणीगोकुळची दूध दरवाढ तातडीने रद्द करा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन; प्रांत उपभोक्ता संरक्षण परिषद समितीच्या पूनमताई तोडकर यांचा इशारागोरगरिबांच्या आशीर्वादाने माझी नोका पैलतीराला लागेल; मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गारकोल्हापूर शहरातील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या चार आस्थापना सीलसंयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे स्मरण: महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनअपघातात मृत सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहणार : मंत्री हसन मुश्रीफ यांचा दिलासा३४ जणांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया; आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या १६ हजार ७०१ वरचांगल्या जीवनशैलीतून सामाजिक शांतता, राष्ट्रउभारणी शक्य : डॉ. बी. आर. कोरे

जाहिरात

 

कार्तिक शुद्ध एकादशी निमित्त निघालेल्या पालखी सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक यांचा सहभाग, वारकऱ्यांसमवेत भक्तीरसात तल्लीन

schedule21 Nov 26 person by visibility 121 categoryसामाजिक

कोल्हापूर  : कार्तिक एकादशीचे औचित्य साधून, आज कोल्हापूर ते श्रीक्षेत्र नंदवाळ या ११ किलोमीटर पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. भाविकांच्या अमाप उत्साहात, झिम्मा फुगडी घालत आणि रिंगण सोहळ्याद्वारे हा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. खासदार धनंजय महाडिक आवर्जून या पायी पालखी सोहळ्यात सहभागी झाले. वारकऱ्यांप्रमाणेच वेशभूषा परिधान करून खासदार महाडिक यांनी हातात टाळ घेऊन विठू नामाचा जयघोष केला. खासदार महाडिक यांनी विठुरायाच्या पालखीचे पूजन करून स्वतः खांद्यावर पालखी घेतली.

 वारकऱ्यांसमवेत भक्ती रसात तल्लीन होऊन खासदार महाडिक यांनी वारकऱ्यांचा उत्साह वाढवला. 

कोल्हापुरातील साकोली कॉर्नर इथल्या हभप पुरुषोत्तम महाराज यादव मठाच्या वतीने, कार्तिक एकादशी निमित्त पायी दिंडी आणि पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. मिरजकर तिकटी इथल्या विठ्ठल मंदिरात आज सकाळपासून भाविकांची गर्दी होती. खासदार धनंजय महाडिक यांनी सुध्दा विठ्ठल रुमिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते आणि अभयसिंह घोरपडे, प्रवीण फडतरे, प्रसाद कुलकर्णी, दिलीप देसाई, खंडेराव जाधव, दत्ता पाटील, अशोक पाटील यांच्या उपस्थितीत, पालखी पुजन झाले. जगद्गुरु संत तुकोबारायांच्या मूर्तीचे पूजन करून, विठ्ठल मंदिरापासून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला.

 डोक्यावर तुळस, हातात विणा, टाळ मृदुंगाचा गजर करत आणि फुगडीचा फेर धरून, भाविकांच्या अमाप उत्साहात दिंडी मार्गस्थ झाली. खासदार महाडिक वारकरी वेशातच या पायी पालखी सोहळ्यात सहभागी झाले.  मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे दिंडी उभा मारुती चौकात आली. इथं उभा मारुती भक्त प्रसाद मंडळ आणि महालक्ष्मी शेजारती ग्रुपच्या वतीनं, २०० किलो खिचडी प्रसादाचं वाटप झालं. त्यानंतर ही दिंडी खंडोबा तालमीकडे मार्गस्थ झाली. तिथं उभा रिंगण सोहळा संपन्न झाला.   त्यानंतर दिंडी पूई खडीकडे निघाली. या दिंडी सोहळ्यात हुपरी इथल्या नाना माळी यांच्या बैलाचा रथ खास आकर्षण ठरला. अत्यंत भक्तीभावाने पार पडलेल्या या पालखी सोहळ्यात हजारो विठठ्ल भक्त सहभागी झाले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes