राजर्षी शाहू स्मारक भवनातील तांत्रिक त्रुटी दूर; 'हम साथ साथ है' कराओके कार्यक्रम उद्या रंगणार
schedule12 Jul 26 person by visibility 300 categoryसामाजिक
कोल्हापूर : राजर्षी शाहू स्मारक भवनातील तांत्रिक त्रुटी आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सुसज्ज झाले आहे. या ठिकाणी होणारा बहुचर्चित 'हम साथ साथ है' हा कराओके गाण्यांचा कार्यक्रम आता सोमवार, १३ जुलै रोजी सायंकाळी ५:३० वाजता पार पडणार आहे.
यापूर्वी इमारतीची साऊंड सिस्टीम सदोष असणे आणि गळतीची समस्या यांमुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. मात्र, संयोजकांनी पुण्याहून तज्ज्ञ अभियंते बोलावून साऊंड सिस्टिमची तपासणी केली आणि इमारतीची डागडुजी पूर्ण केली आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून, जास्तीत जास्त करवीरकर रसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन 'कला सक्त एनटीसीडीओ'च्या वतीने करण्यात आले आहे.