महाराष्ट्र लवकरच होणार ‘रेल्वे फाटकमुक्त’; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
schedule12 Jul 26 person by visibility 109 categoryराज्य
नागपूर: राज्यातील नागरिकांना सुरक्षित व जलद दळणवळण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, येत्या तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाण पुलांचे बांधकाम करून महाराष्ट्र ‘रेल्वे फाटकमुक्त’ केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर येथे आयोजित ९ पायाभूत सुविधांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ४८४ कोटी रुपये खर्चाच्या ९ विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये रेल्वे ओव्हरब्रिज, सबवे आणि अंडरब्रिजचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते.
रेल्वे फाटकांवरील अपघातांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी सरकारने विशेष प्राधान्य दिले आहे. राज्यातील ५२४ रेल्वे फाटकांपैकी १० हजारपेक्षा जास्त वाहतूक घनता असलेल्या १२१ फाटकांसह एकूण १४५ पुलांचे काम 'महारेल'च्या (महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) माध्यमातून पूर्ण केले जाणार आहे. महारेलने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्पांचा खर्च कमी केला असून, बांधकामाचा वेगही वाढवला आहे, असे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, पूर्व नागपूरच्या विकासकामांसाठी एनएचएआयतर्फे ४० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. या भागात आधुनिक भाजी मार्केट आणि स्पोर्ट क्लब उभारण्यात येणार आहेत. नागपूरमधील मेट्रो प्रकल्पामुळे शहराच्या वैभवात भर पडली असून, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे औद्योगिक प्रगती व रोजगाराच्या संधी वाढत आहेत.
यावेळी भगवान संभनाथ चौक ते डिप्टी सिग्नल मार्गावरील रेल्वे ओव्हरब्रिजला माजी उपमहापौर बाहरीनबाई सोनबोईर यांचे नाव देण्यात येत असल्याची घोषणाही करण्यात आली. या कार्यक्रमास विविध लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.