SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेलोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमले कोल्हापूरशक्तीपीठ महामार्ग विरोधात एक जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन...; ▪️राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या वर दडपशाही करू नये; आमदार सतेज पाटील....‘गोकुळ’ मार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन...शक्तीपीठ महामार्गावरून आमदार सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री आबिटकर यांनी भूमिका स्पष्ट करावी...खासदार धनंजय महाडिक आणि भाजपा पदाधिकार्‍यांनी केले राजर्षि शाहूंच्या स्मृतींना अभिवादनमिरज येथे भरदिवसा गोळीबार करुन फरारी झालेला आरोपी व त्याचे पाच साथीदार जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई कोल्हापूरी चप्पलच्या रक्षणासाठी कृष्णराज महाडिक यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, इटलीतील फॅशन शो मध्ये विनापरवाना कोल्हापूरी चप्पलची नक्कल केल्याबद्दल कारवाई मागणीसंजय घोडावत इन्स्टिट्यूट, उन्हाळी परीक्षा २०२५ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल; १३ विषयाचा निकाल १०० टक्के वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव

जाहिरात

 

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, उन्हाळी परीक्षा २०२५ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल; १३ विषयाचा निकाल १०० टक्के

schedule26 Jun 25 person by visibility 130 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, आतिग्रे येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अंतर्गत पॉलिटेक्निकच्या  उन्हाळी परीक्षा २०२५ मध्ये इन्स्टिट्यूट चा शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चंकित निकाल लागला आहे.  इन्स्टिट्यूट च्या पॉलिटेक्निक विभागाचा  एकूण १३ विषयांचा निकाल १००% लागला असून, हे यश सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शैक्षणिक व्यवस्थापनाच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक आहे.

या परीक्षेमध्ये सर्व विभागांमधून मिळून एकूण ४५ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवले. विशेष म्हणजे ११ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १००  गुण  वेगवेगळ्या विषयांमध्ये मिळवले, ४३६ विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मार्क्स मिळाले, २८८  विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास  मिळाला आहे.  

तृतीय वर्ष  सर्व विभागातून   गुणवान विद्यार्थी  सावजी सिद्धी श्रीनिवास ९८.१२%,
बरगाले आदित्य संजय ९६.५९%, मनाडे निर्झरा अनिल ९५.८८%, 
द्वितीय वर्ष - पाटील मनाली राजेंद्र ९३.८८%, खोराटे ऐश्वर्या सुर्यकांत   ९१.०६., नेवगे श्रावणी मधुकर . ९०.५९% प्रथम वर्ष सर्व विभाग:  पवार ईशान चेतन ९४.००%, कु.जाधव श्रेया जयवंत ९३.०६%,
पटेल कुणाल वसंत  ९२.२२% . अशी माहिती पॉलिटेक्निक अकॅडमिक डीन प्रा. रवींद्र धोंगडी यांनी दिली आहे.

संचालक, डॉ. विराट  गिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले. या सोबतच यापुढेही उच्चांकी निकालाची परंपरा कायम राहील अशी आशा व्यक्त करून या यशाचे सर्व श्रेय विद्यार्थी, सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि सर्व विभाग प्रमुख यांना देऊन सर्वांचे मनापासून कौतुक केले. संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त, विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes