SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी तरतूद महत्वाचीडीकेटीई आणि एमकेसीएल यांच्यात सामंजस्य करार संपन्नपदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देऊ : दिपक चव्हाण; शिवसेनेच्या वतीने दीपक चव्हाण यांचा निवडीबद्दल सत्कारबालविवाह मुक्त जिल्ह्यासाठी आढावा बैठक संपन्नप्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेतकेआयटी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘आयडियाथॉन’ ची सांगता, ७१ इनोव्हेशन व सृजनशी कल्पनांचे तरुणाईकडून सादरीकरणसंजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहातआद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके: भारतीय स्वातंत्र्याचा पहिला हुंकारघोषवाक्य व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : उपसंचालक (माहिती) प्रवीण टाकेशिवाजी विद्यापीठामध्ये प्रथमच 'माझे विद्यार्थी, माझे उद्योजक' माजी विद्यार्थ्यांसोबत सामंजस्य करार

जाहिरात

 

केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी तरतूद महत्वाची

schedule17 Feb 26 person by visibility 65 categoryसामाजिक

  कोल्हापूर: महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात दहा टक्के तरतूद करण्यात आली आहे. पण महिलांची लोकसंख्या 49 % आहे. त्या प्रमाणात वाटा असला पाहिजे, असे मत प्रा. (डॉ). विजय ककडे यांनी व्यक्त केले ते शिवाजी विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६’ या कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘दिलासा’ महिला संस्थेच्या अध्यक्ष डॉ. रूपा शहा होत्या. भारतामध्ये ‘जेंडर बजेट’ या संकल्पनेला 20 वर्ष पूर्ण झाले असून केंद्रीय अर्थसंकल्पात ‘जेंडर बजेट स्टेटमेट’ दिले जाते, असेही प्रा. (डॉ). विजय ककडे यावेळी म्हणाले पण महिला उपक्रम, योजना या प्रतिनिधीक स्वरुपात न राहता महिलांचे मूळ प्रश्न सोडवले पाहिजे. यावर त्यांनी भर दिला.

  वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे डॉ. केदार मारुलकर यांनी ‘स्वयंसेवी महिला उद्योजक’ यांना केंद्रीय अंदाजपत्रकात महत्व दिले असून महिला उद्योजक यांच्यासाठी रिटेल आऊटलेट ची तरतूद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रत्येक जिल्यात शासकीय वसतिगृह आणि महिलांसाठी हॉस्टेलची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले तसेच युवक व नारीशक्ती हे केंद्रीय अंदाजपत्रकाचे मुख्य आधार असल्याचेही डॉ. केदार मारुलकर म्हणाले.

  अध्यक्षीय समारोपात बोलताना डॉ. रूपा शहा यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी याआधी  करण्यात आलेल्या तरतुदीच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन झाले तरच महिलांसाठी देण्यात आलेल्या ‘बजेटचा’ उदेश साध्य होण्यास मदत होईल. महिलांना निर्णय क्षमता असली पाहिजे, असेही त्या या प्रसंगी म्हणाल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्याचा परिचय स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक प्रा.(डॉ.) निशा पवार यांनी केले. आणि ‘जेंडर बजेट’ ही संकल्पना महत्वाची असून सर्व स्तरावर हा दृष्टीकोन तयार झाला पाहिजे. असे मत कार्यशाळेचा उदेश सांगताना त्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी डॉ. राजेंद्र पारिजात व प्रा. (डॉ). प्रतिभा पाटणकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन यश हेगडेपाटील यांनी केले या कार्यशाळेत इतिहास, मानसशास्त्र, इंग्रजी, अर्थशास्त्र ,पत्रकारिता व स्त्री अभ्यास केंद्राचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes