प्रभाग क्रमांक 11 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा
schedule12 Jan 26 person by visibility 75 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 11 मधून महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसच्या हात या चिन्हावर यशोदा रवींद्र आवळे, जयश्री सचिन चव्हाण, संदीप सुभाष सरनाईक, तर शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर सचिन किरण मांगले निवडणूक रिंगणात आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! या अभियानातून कोल्हापूरच्या विकासाचा नव संकल्प करण्यात आला आहे. प्रभागांमध्ये उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा त्यांचा विजय निश्चित करेल असे चित्र आहे.
प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 11 मध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून यशोदा आवळे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला विभागातून जयश्री चव्हाण तर सर्वसाधारण गटातून संदीप सरनाईक व सचिन मांगले हे निवडणूक रिंगणात आहेत. प्रभागांमध्ये उमेदवाराकडून प्रचार फेरी गाठीभेटी रॅली द्वारे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. प्रभागातील सर्वच उमेदवारांना सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी लाभली असून प्रभागामध्ये विविध उपक्रमाद्वारे, कार्याद्वारे ते मतदारांना परिचित आहेत. यामुळे प्रभागात त्यांना वाढता पाठिंबा पहावयास मिळत आहे.

