विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात कोल्हापूर जिल्हा मुस्लिम शैक्षणिक व सामाजिक सलोखा मंच व समस्त मुस्लिम समाजातर्फे तीव्र धरणे आंदोलन
schedule24 Jul 26 person by visibility 128 categoryसामाजिक
कोल्हापूर: नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाविरोधात आणि दिल्लीत न्याय मागण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर केंद्र शासनाच्या इशाऱ्यावरून केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात संतापाची लाट लोटली आहे. ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमाक्ष कोल्हापूर जिल्हा मुस्लिम शैक्षणिक व सामाजिक सलोखा मंच आणि समस्त मुस्लिम समाजातर्फे धरणे आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
दिल्लीमध्ये सनदशीर मार्गाने व संविधानाला धरून शांततेत विद्यार्थ्यांचा संसदेवर मोर्चा सुरू असताना, दिल्ली पोलीस व रिझर्व्ह फोर्सने विद्यार्थ्यांवर लाथाबुक्क्यांनी व काठ्यांनी अमानुषपणे मारहाण केली. या दडपशाहीविरोधात कोल्हापुरात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.
या धरणे आंदोलनामध्ये अध्यक्ष कादरभाई मलबारी, जाफरबाबा सय्यद, वसंतराव मुळीक, बावनराव रानगे, इकबाल पटेल, आसिफ मोकाशी, बाबासाहेब काझी, खलील कवठेकर, काजल कांबळे, समीर मुजावर, आरीफ तांबोळी, हाजी इर्शाद वंडवल, मुस्ताक मलबारी, सलीम बागवान, नासर धारवाडकर, इरफान मोमीन, इम्रान मुजावर, समीर अत्तार, बाबूराव थोरडगे, शहानूर कलावंत, शौकत बक्षू, दस्तगीर बागवान, इम्तियाज बागवान, सरफराज जमादार यांच्यासह अनेक मान्यवर व समस्त मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.