अखेर केंद्र सरकार झुकले! २६ दिवस झुंजणाऱ्या सोनम वांगचुक यांचे उपोषण समाप्त!
schedule24 Jul 26 person by visibility 129 categoryदेश
नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी घोटाळ्याविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रणशिंग फुंकणारे प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी आपली जिद्द सोडली नाही आणि अखेर सरकारला गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे! तब्बल २६ दिवस मृत्यूशी झुंज देत, अन्नाचा एकही दाणा पोटात न घेता त्यांनी चालवलेल्या या ऐतिहासिक आमरण उपोषणासमोर अखेर केंद्रातील सत्तेला नमते घ्यावे लागले आहे.
गुरुवारी उशिरा रात्री केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना स्वतः गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात धाव घ्यावी लागली. अखेर सरकारकडून मागण्या मान्य करण्याचे लिखित आश्वासन मिळाल्यानंतर, जे. पी. नड्डा यांच्या हस्ते ज्यूस घेऊन वांगचूक यांनी आपले हे महा-उपोषण मागे घेतले.
विद्यार्थ्यांच्या हिरवून घेतलेल्या हक्कासाठी आणि आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत वांगचूक यांनी सरकारकडून खालील कडक अटी मान्य करून घेतल्या आहेत:
* विद्यार्थ्यांवर विनाकारण गुन्हे नाही: दिल्लीतील आंदोलनादरम्यान किंवा संसदेवर मार्च काढताना विद्यार्थ्यांवर दाखल केलेले किंवा दाखल होणारे गुन्हे मागे घेतले जातील आणि कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही.
* परीक्षा सुधारणांवर थेट संसदच चर्चा: शिक्षण व्यवस्थेतील काळाबाजार संपवण्यासाठी आणि कठोर परीक्षा सुधारणांसाठी संसदेत विशेष चर्चा घडवून आणण्याचे लिखित आश्वासन.
* पिडित कुटुंबांना न्याय: पेपरफुटी आणि नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या (आत्महत्या केलेल्या) विद्यार्थ्यांच्या दुःखी कुटुंबांना योग्य तो आर्थिक मोबदला व न्याय दिला जाईल.
◼️"देशात हिंसाचार नको, म्हणून निर्णय!" - सोनम वांगचूक यांचा इशारा
उपोषण सोडल्यानंतर आपल्या तडाखेबंद अंदाजात प्रतिक्रिया देताना सोनम वांगचूक यांनी स्पष्ट केले की, "देशातील संतापलेली तरुण पिढी आणि संभाव्य हिंसाचाराचा उद्रेक टाळण्यासाठी मी हे उपोषण मागे घेत आहे. देशभरातून ६५ हून अधिक खासदारांनी मला पाठिंबा दिला. सरकारला आमच्या अटी मान्य कराव्याच लागल्या."
दरम्यान, प्रकृती खालावल्यामुळे आणि तब्बल ११ किलो वजन घटल्यामुळे मृत्युशी सुरू असलेली त्यांची ही जिद्दी लढाई सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली असून, तरुणांमध्ये या लढ्याबद्दल प्रचंड जोश व संताप दोन्ही पाहायला मिळत आहेत.
◼️सोनम वांगचूक यांनी प्रकृतीअभावी आणि संभाव्य हिंसाचार टाळण्यासाठी उपोषण मागे घेतले असले, तरी काँग्रेसने जाहीर केले आहे की विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर पक्षाचा लढा संसदेपासून रस्त्यापर्यंत असाच सुरूच राहील. तसेच कॉक्रोज जनता पार्टीच्या शिष्टमंडळाबरोबर सरकारची आज दुपारी साडेबाराच्या सुमारास बैठक होणार आहे त्यानंतरच सरकारने सर्व मागणी मान्य केल्या त्यातून तोडगा निघाल्यास आंदोलन थांबण्याबाबत निर्णय होऊ शकतो.