SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारलेराज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५,०१२ सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील‘आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत उपाय’ या विषयावर शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषदजिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अतिरीक्त निधी मिळणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकरगंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी जिल्ह्यात पेलिएटिव्ह केअर सेवेचा प्रारंभमंदिर प्रीमियम लीग येत्या १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यानअपघातग्रस्तांच्या मदतीसाठी राह-वीर योजनापश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे, भव्य भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे उद्या शुक्रवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा विजेतासंजय घोडावत विद्यापीठाचा क्यू-स्पायडर्स, बंगळुरूसोबत शैक्षणिक व प्लेसमेंट करार

जाहिरात

 

‘आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत उपाय’ या विषयावर शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषद

schedule12 Feb 26 person by visibility 125 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातर्फे येत्या शनिवारी (दि. १४) ‘आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत उपाय’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. झेक रिपल्बिक येथील प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. इंद्रजीत घोष यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार असून प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती अधिविभाग प्रमुख डॉ. संजय चव्हाण यांनी दिली आहे.

डॉ. चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या रँकिंग फ्रेमवर्कमध्ये आघाडीचे स्थान प्राप्त केलेला रसायनशास्त्र अधिविभाग डीएसटी-फिस्ट आणि युजीसी-सॅप योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त आहे. ए.एन.आर.एफ.-पेअर उपक्रम आणि भारत सरकारच्या खनिकर्म मंत्रालयातर्फेही मान्यताप्राप्त आहे. अधिविभागातर्फे आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत रसायनशास्त्रावर आधारित उपायांद्वारे शाश्वत विकास, ऊर्जा आणि पर्यावरणातील जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अभिनव आणि उदयोन्मुख कल्पनांच्या देवाणघेवाणीच्या अनुषंगाने विचारमंथन करण्यात येणार आहे. परिषदेत स्ट्रक्चरल इनऑर्गेनिक, ऑर्गेनो-मेटॅलिक आणि मटेरीयल्समधील अत्याधुनिक संशोधनावर प्रकाश टाकण्यात येईल. उत्प्रेरक हरित रसायनशास्त्र आणि आयोनिक द्रव पदार्थांच्या निर्मितीच्या अनुषंगानेही चर्चा होईल. फोटो कॅटॅलिस्ट आणि हायड्रोजन संबधित प्रक्रियासह उर्जा साठवणूक आणि उर्जा रूपांतरण तंत्रज्ञानानातील नवकल्पनांबाबतही संशोधन निबंध सादर केले जातील. परिषदेत सुमारे ३५० पेक्षा अधिक देशविदेशांतील संशोधक, शिक्षक, विद्यार्थी सहभागी होणार असून दोनशेहून अधिक शोधनिबंध सादर करण्यात येतील.

परिषदेत प्रा. ग्यानविटो विले (इटली), प्रा. जगदीश राजेनहळ्ळी (जर्मनी), डॉ. सचिन नानावटी (इंग्लंड), प्रा. अनंत कापडी, आयसीटी, मुंबई, डॉ. दिनेश सावंत, एनसीएल, पुणे, प्रा. व्यंकट कृष्णन, आयआयटी, मंडी आदी नामवंत शास्त्रज्ञ परिषदेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेचे समन्वयक म्हणून डॉ. संजय कोळेकर काम पाहात असून प्रा. हंगीर्गेकर, प्रा. राशिनकर हे विविध समित्यांचे प्रमुख आहेत. परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. कल्याणराव गरडकर आहेत. डॉ. सपताळ, डॉ. दगडे, डॉ. संकपाळ यांच्यासह कार्यकारिणी परिश्रम घेत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes