कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा इफको कडून गौरव
schedule17 Jan 26 person by visibility 66 categoryउद्योग
इचलकरंजी : कृषि क्षेत्राबरोबरच आर्थिक व सामाजिक क्षेत्रामध्येही इफकोचे बहुमूल्य योगदान असून इफको निर्मित नॅनो उत्पादने दर्जेदार असून मातीची सुपीकता आबाधीत ठेवून पिकांच्या शाश्वत वाढीसाठी त्यांचा वापर करावा, सहकारमुळे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास झाल्याचे नमूद करत सहकार चळवळ टिकली पाहिजे. त्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय सहकारी धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यावेळी दिले. या सहकार परिषदेमध्ये इफकोच्या नॅनो खतांचा वापर करणाऱ्या संस्थांना गौरविण्यात आले.
इंडियन फारमर्स फर्टीलायझर को-ऑप. लिः (इफको) मार्फत नॅनो खते विभागीय सहकार परिषद कोल्हापूर येथे नुकतीच संपन्न झाली.
या परिषदेसात नामदार प्रभु अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यातर्फे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनातून ऊस उत्पादन वाढीसाठी नॅनो युरिया व नॅनो डीएपी या खतांचा ५००० एकर ऊस क्षेत्रावर आजअखेर ड्रोन फवारणीद्वारे वापर करण्यात आला.
या खतांच्या फवारणीसाठी कारखान्यातर्फे ड्रोनची सुविधा माफक दरात बिनव्याजी क्रेडीटवर उपलब्ध करून दिली आहे. नॅनो खतांच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात वाढ झाली आहे.
ऊस विकास योजनेअंतर्गत कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ऊस क्षेत्रावर ड्रोन फवारणी राबविल्याने या योजनेची दखल घेऊन कारखान्यास नॅनो खते विभागीय सहकार परिषदेमध्ये सुरेश प्रभू यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर (केन) किरण कांबळे व सिनियर अॅग्री ओव्हरसियर अजित चौगुले उपस्थित होते. या परिषदेस राज्य विपनन प्रबंधक इफको डॉ. एम. एस. पोवार, क्षेत्रीय अधिकारी विजय बुणगे, कोल्हापूर, इफको आरजीबी सदस्य विलासराव पाटील, जगन्नाथ पाटील, नेमगोंडा पाटील तसेच सांगली व सातारा जिल्ह्यातील विकास सेवा सोसायटी व तालुका खरेदी विक्री संघ यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.